नांदेड आगारातून एसटीची चाके हालली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus
नांदेड आगारातून एसटीची चाके हालली

नांदेड आगारातून एसटीची चाके हालली

नांदेड : राज्यातील अनेक आगारातून काही प्रमाणात का होईना एसटी बस सुरु झाल्या होत्या. मात्र, नांदेड विभागातील एकही कर्मचारी कामावर परत येत नसल्याने बस सुरु करण्यास अडथळा येत होता. मात्र, इतर जिल्ह्यातील एसटीबस नांदेडला ये-जा करत असल्याचे बघून काही कर्मचारी कामावर परतल्याने मंगळवारी (ता. चार) दोन तर बुधवारी (ता. सहा) पुन्हा एक बस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आली. त्यामुळे दोन महिन्यांपासून थांबलेले एसटीची चाके हळूहळू धावताना दिसत आहेत. (ST moved from Nanded depot)

हेही वाचा: शेतकऱ्यांच्या खात्यात 'एफआरपी' चे 8299 कोटी जमा

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, यासाठी त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या असल्या तरी एसटीला राज्य शासनात विलनीकरण करण्यास नकार दिल्याने प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. यावर बुधवारी (ता. पाच) निकाल येणे अपेक्षित होते. परंतु ऐनवेळी निकाल लांबणीवर पडल्याने एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. त्यामुळे हळूहळू संपातील कर्मचारी कामावर परत येत आहेत.

हेही वाचा: बेळगाव : आंतरराज्य वाहतूक सुरु राहणार

नांदेड विभागातील ५८ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली होती. त्यापैकी ४३ कर्मच्याऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली होती. त्यातील दोघांनी समाधानकारक उत्तर दिली नसल्याने त्यांच्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाची नोटीस दिलेल्या कर्मचाऱ्यांकडून देखील अपेक्षित उत्तर मिळाले नाही तर त्यांच्यावर देखील बडतर्फची कारवाई केली जाणार असल्याची माहिती एसीटी विभागाच्या वतीने देण्यात आली.(Nanded news)

हेही वाचा: महापुरुषांच्या पुतळे निर्मितीचे बेळगाव बनतंय ‘हब’

मंगळवारी या मार्गावर बस धावली

  • नांदेड ते कंधार बस (एमएच २० - बीएल ३५४०), वेळ - पावणे एक वाजता, उत्पन्न - पाच हजार ५४० रुपये.

  • नांदेड ते भोकर बस (एमएच २० - एन ९७७४), वेळ - सव्वातीन, उत्पन्न - दोन हजार २६० रुपये

  • नियते - दोन, फेऱ्या - चार, किलोमीटर - २५७, उत्पन्न सात हजार आठशे रुपये, भारमान - ४८.०१ टक्के

मंगळवारी धावलेली बस

  • नांदेड ते भोकर बस (एमएच २० - एन ९७७४), वेळ - सव्वासात वाजता,

  • नांदेड ते देगलुर बस (एमएच २० - बीएल ३५४०), वेळ - अकरा वाजता

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NandedST
loading image
go to top