Nanded News | भटक्या कुत्र्यांची नांदेडकरांमध्ये दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stray dogs terrorize in Nanded

भटक्या कुत्र्यांची नांदेडकरांमध्ये दहशत

नांदेड : नांदेड शहरात मोकाट कुत्र्यांनी मोठा धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरून जाणारे पादचारी, अंगणात रस्त्यावर तसेच मोकळ्या मैदानात खेळणारी मुले व वाहनचालकांचा पाठलाग करून त्यांच्यावर हल्ला होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नांदेडकरांमध्ये मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. (Nanded News)

हेही वाचा: धक्कादायक! अल्पवयीन मुलाने ४ जणांना कारने चिरडलं

शहरात कुत्र्यांती दहशत वाढली असून सर्वसामान्य नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिवाय मोकाट कुत्र्यांसह शहरात डुकरांचा मुक्त संचार वाढल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गावकुसाबाहेरील म्हणजेच काॅलनी परिसरात कुत्र्यांचे टोळके वाढले आहेत.

शिवाय सर्वच प्रभागात मोकाट जनावरांचा उपद्रव सुरु आहे. रस्त्यावरून जाताना दबा धरून बसलेले कुत्रे वाहन चालकावर कधी हल्ला करेल, याचा नेम नाही.

हेही वाचा: "सगळ्यात आधी राज ठाकरेंनी वाईन शॉप सुरू करायला सांगितलं'

शहरातील विद्यार्थी तथा नागरिक यांना रोज हा अनुभव येत आहे. वाहनचालकाने अचानक झालेल्या हल्ल्याच्या भीतीने बचावासाठी वाहनाचा वेग वाढविल्यास कुत्रे त्यापेक्षा दुप्पट वेगाने मागे पळत असततात. त्यामुळे दुचाकीस्वाराचा वाहनावरून ताबा सुटून अपघात होतो.

कुत्र्यांच्या टोळक्यामुळे माॅर्निंग वाॅकसाठी जाणाऱ्या मुलांपासून ते ज्येष्ठांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन बसविण्यात येणार : मंत्री राजेश टोपे

मोकाट कुत्र्यांचा उच्छाद

दिवसेंदिवस कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटी लागली आहे. कुत्र्यांचे टोळके दिवसा आणि रात्री-अपरात्री घरे आणि दुकानांबाहेरील पादत्राणे पळवून नेतात. या घटना वारंवार घडत असल्याने शहरवासियांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Web Title: Stray Dogs Terrorize Nanded Uncleanliness Including Disease

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top