आठ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरली

किनवट तालुका : ज्वारी, मका, तीळ व भूईमुग पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल
आठ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरली
आठ हजार ५३९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरलीsakal

किनवट : मागील दोन ते तीन वर्षांपासून मुबलक पावसाळा होत असल्याने, तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप व रब्बीसोबतच उन्हाळी हंगामातही सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून घेत पीक घेण्याकडे कल वाढत चालला आहे. किनवट तालुक्यातील उन्हाळी हंगामासाठी सर्वसाधारण क्षेत्र ४ हजार ६५९ हेक्टर आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या अंतीम अहवालानुसार यंदा जवळपास दुप्पट म्हणजे ८ हजार ५३९ हेक्टरवर विविध उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आलेली आहे. त्याची टक्केवारी १८३.२८ टक्के भरते.

तालुक्यातील शेतकरी गतवर्षापासून उन्हाळी पिकांमध्ये तृणधान्यात ज्वारी, मका तर गळीत धान्यात भुईमूग व तीळ पीक घेण्यात जास्त रस दाखवीत आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे वा प्रकल्पातील पाणी मिळू शकते अशा भागात उन्हाळी पिके घेण्यात आलेली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा मका व तिळाचा पेरा वाढलेला आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तालुक्यात तृणधान्यातील उन्हाळी ज्वारीसाठी १ हजार ३९७ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, २ हजार १३ हेक्टर ज्वारीचा पेरा झालेला आहे. ज्याची टक्केवारी १४४.०९ आहे. मक्यासाठीचे क्षेत्र केवळ ७६२ हेक्टर असून, यंदा १ हजार ८६० हेक्टरवर अर्थात २४४.०९ टक्के पेरणी झालेली आहे. उन्हाळी भातासाठी ३५ हेक्टर क्षेत्र असून, त्यात वाढ होऊन ८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गळीधान्यात भुईमूगासाठी स.सा.क्षेत्र १,१५२ हेक्टर असून, यावर्षी १ हजार ६४३ हेक्टरवर पेरा झालेला आहे. तिळासाठीचे क्षेत्र ७८९ हेक्टर होते त्यात वाढ होऊन तब्बल १ हजार ६३४ हेक्टरवर तीळ पेरण्यात आलेला आहे. त्याची टक्केवारी २०७.१० टक्के आहे. याशिवाय उन्हाळी मूग ४३ हेक्टर, चारापिकात ज्वारी ४७ हेक्टर, मका ९७ हेक्टर, खरीप बियाण्यासाठी सोयाबीन ६६४ हेक्टर, सूर्यफूल ४ हेक्टर तर भाजीपाल्याची २८८ हेक्टरवर लागवड झालेली आहे. सोबतच ऊस १५ हेक्टर, टरबूज ७२ हेक्टर, धने ५ हेक्टर तर मिरची ३५ हेक्टरवर घेण्यात आली आहे. गतवर्षी उन्हाळी पेरा ७ हजार ४५७ हेक्टर होता यंदा तो १ हजार ०८२ हेक्टरने वाढलेला आहे.

सरकारने नवीन उपक्रम घेतले हाती

उन्हाळी पिके केवळ अतिरिक्त उत्पन्नच देत नाहीत तर शेतकऱ्यांसाठी रब्बी आणि खरीप हंगामादरम्यान रोजगाराच्या संधीही निर्माण करून उत्पादनही वाढवतात. कडधान्ये, भरड धान्ये, पोषक तृणधान्ये आणि तेलबिया यांसारख्या उन्हाळी पिकांच्या लागवडीसाठी सरकारने विविध कार्यक्रमांद्वारे नवीन उपक्रम हाती घेतले आहेत. उन्हाळी हंगामादरम्यान निम्म्याहून अधिक लागवड क्षेत्र कडधान्ये, तेलबिया आणि पौष्टिक तृणधान्याखाली असले तरी सिंचनाच्या स्रोतांच्या सहाय्याने शेतकरी उन्हाळी हंगामात भात, भाजीपाला आणि टरबूज, खरबूज व पपई आदींची लागवड करतात. पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सामग्रीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब सुलभ करण्यासाठी शासनस्तरावरून व तालुका कृषीविभागाकडून पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन शेतकऱ्यांना दिले जाते. मोठ्या प्रमाणात आयात कराव्या लागत असलेल्या तेलबिया आणि डाळींचे उत्पादन वाढविण्याला साध्या सरकारचे प्राधान्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com