Nanded Corona : रविवारी १०२ रुग्ण झाले बरे, बाधित रुग्ण ९५ तर तिघांचा मृत्यू

प्रमोद चौधरी | Sunday, 16 August 2020

रविवारी सायंकाळी ४७८ अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ३४० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आरटीपीसीआरद्वारे ५४ तर अॅटीजेन रॅपिड टेस्टद्वारे ४१ असे एकूण ९५ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

नांदेड : जिल्ह्यात रविवारी (ता.१६) १०२ कोरोना बाधित रुग्णांना उपचारानंतर बरे होवून घरी सोडले आहे. तर ९५ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण रुग्णांची संख्या चार हजार १०६ इतकी झाली आहे. दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला असून, एकूण मृत्यू झालेल्या कोरोना बाधितांची संख्या १४७ इतकी झाल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

रविवारी सायंकाळी ४७८ अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये ३४० अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आरटीपीसीआरद्वारे ५४ तर अॅटीजेन रॅपिड टेस्टद्वारे ४१ असे एकूण ९५ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. उपचार सुरु असताना चिंचाळा येथील ६० वर्षीय आणि मुदखेड येथील ३५ वर्षिय महिलांचा विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालयामध्ये देगलूर येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत १९३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहितीही डॉ. भोसीकर यांनी दिली.

हेही वाचा - 

नांदेड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. मात्र, आता कोरोनाचा प्रसार ग्रामीण भागातही पोचल्याने नांदेड शहरापेक्षा ग्रामीणमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे महिलांचाही यामध्ये सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. तरीही नागरिक ऐकायला तयार नाही. परिणामी कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
 
नांदेड कोरोना मीटर

 • एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार ३९५
 • एकूण घेतलेले स्वॅब - २९ हजार ७७२
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - २३ हजार ६२२
 • एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण - चार हजार १०६
 • रविवारी सापडलेले पाॅझिटिव्ह रुग्ण - ९५
 • एकूण मृत्यू - १४७
 • रविवारचे मृत्यू - तीन
 • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार ४१४
 • रविवारी सुटी दिलेले रुग्ण - १०२
 • रुग्णालयात उपचार सुरु असलेले रुग्ण - एक हजार ५१८
 • रविवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - ५०२
 • रविवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १९३