
ग्रामविकास विभागाच्या ता. २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये जीआयएस आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतींचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. संगणीकृत नकाशे, सनद व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. या गावठाण भुमापनामुळे जिल्ह्यातील गावठाणातील घरांचे नकाशा व सीमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, त्याची नोंद होईल.
नांदेड - भूमीअभिलेख विभाग व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त सहभागाने महाराष्ट्रातील गावठाण भूमापन झाले नसलेल्या गावांचे ड्रोन गावठाण भूमापन काम सुरु आहे. नांदेड तालुक्यातील धनगरवाडी येथे सुरु असलेल्या गावठाण भूमापन सर्वेक्षण कामाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी मंगळवारी केली.
दरम्यान, नांदेड व हिमायतनगर तालुक्यात सुरु असलेल्या सर्व्हेक्षण कामात ग्रामपंचायत कर्मचारी व जनतेने सर्व्हेक्षण करणाऱ्या पथकांना सहकार्य करावे व मिळकतीचे सीमांकन करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सुरेखा सेठिया यांनी केले.
हेही वाचा - Breaking : डुकरांनी ताेडले मृतदेहाचे लचके; नांदेडकरांचा विष्णुपुरीच्या रुग्णालयावर राेष
भूमापन कामाचे महत्व दिले पटवून
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर पाहणी करतेवेळी गावातील नागरिकांना गावठाण भूमापन कामाचे महत्व पटवून दिले. यासाठी ग्रामविकास विभागाच्या ता. २२ फेब्रुवारी २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये जीआयएस आधारे गावांच्या गावठाणातील मिळकतींचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे.
हेही वाचलेच पाहिजे - परभणी : ग्रामीण भागात आजपासून प्लास्टिक वेचणी मोहीम- शिवानंद टाकसाळे
यामुळे ‘हा’ होणार फायदा
संगणीकृत नकाशे, सनद व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. या गावठाण भुमापनामुळे जिल्ह्यातील गावठाणातील घरांचे नकाशा व सीमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र किती आहे, त्याची नोंद होईल. ग्रामस्थांचे नागरी हक्काचे संवर्धन होईल. गावातील रस्ते, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होवून अतिक्रमण रोखता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे मिळकतधारकांना घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल. ग्रामपंचायतींना गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होतील.
नांदेडच्या ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा
मोजणी कामाची माहिती
यावेळी जिल्हा अधीक्षक भूमीअभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया यांनी प्रत्यक्ष गावठाण ड्रोन सर्व्हेची माहिती दिली. त्यावेळी भारतीय सर्व्हेक्षण विभागाचे सर्व्हेक्षक एस. विनोदकुमार यांनी ड्रोनव्दारे मिळकतीच्या प्रत्यक्ष चालु असलेल्या मोजणी कामाची माहिती दिली. त्यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यु. डी. तोटावाड, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक व ग्रामपंचायत प्रशासक हे उपस्थित होते.