मराठवाड्याचा स्वरमणी हरपला; ख्यातकिर्त गायक प्रदिप पंडीत यांचे अकाली निधन

file photo
file photo

नांदेड : पहाडी आवाजाचा धनी असलेला हरहुन्नरी प्रसिध्द गायक प्रदीप पंडीत यांचे सोमवारी (ता. आठ) सकाळी साडेनऊच्या सुमारास अकाली निधन झाले. स्वरांच्या जादुईचा मराठवाड्यातील स्वरमणी आज कायमचा लुप्त झाल्याने संगीत क्षेञावर शोककळा पसरली.

प्रदीप पंडीत फुले- शाहु- आंबेडकरी चळवळीतील बिन्नी गायक. समाज जनजागृतीचा त्याचा पहाडी आवाज प्रत्येकाच्या काळजावर कोरला होता. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या प्रदीप पंडीतला गोड गळ्याची निसर्गदत्त देणगी लाभली होती. कुठल्याही संगीत शाळेत संगीताचे धडे न गिरवीता त्याने रसिकाच्या मनावर अधिराज्य केले.

नांदेडच्या प्रमोद गजभारे प्रस्तुत बुध्द पहाट व बुध्द भिम स्वरांजली समाज प्रबोधन चळवळीतला प्रदीप पंडीत एक मुख्य शिलेदार होता. बोधीवृक्ष मला लागली वोढ तुझी व वो बात करो पैदा तुम आपनी जुब्बानो मै ही त्यांची दोन गाणी विलक्षण लोकप्रिय होती. रसिकांची दाद आणि वन्समोअरचा गजर झाला नाही असे कधिच घडले नाही. सभागृहाला भाराऊन सोडण्याची प्रंचड ताकद त्याच्या गायिकीत होती. 

मोठ्या कार्यक्रमात प्रदिप गायाचाच पण मयताचे जागरण गाणे सुध्दा तो गात असे. त्यांने जवळपास अडीच ते तिन हजार मयत जागरणाचे कार्यक्रम केले आहेत. संगीत क्षेञातला हुकमी एक्का अशी ओळख असलेल्या प्रदिप पंडीत यांने आज अखेरचा श्वास घेतला. मराठवाड्याची स्वरज्योत आज मावळली. मराठवाडयाच्या या स्वरमणीस अनेकांकाडून भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.
      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com