esakal | बोगस बियाणे कंपनी व दुकानदारांवर कारवाई करा- उमेश मुंडे
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

शेतकरी पुन्हा दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. अशा बियाणे कंपनी व दुकानादारांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ग्रामिण) उमेश मुंडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याकडे केली आहे. 

बोगस बियाणे कंपनी व दुकानदारांवर कारवाई करा- उमेश मुंडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : अगोदरच शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असताना पुन्हा यावर्षी सोयाबीनचे बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची क्रुर थट्टा करण्यात आली. त्यामुळे शेतकरी पुन्हा दुबार पेरणीच्या संकटात सापडला आहे. अशा बियाणे कंपनी व दुकानादारांवर फौजदारी कारवाई करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ग्रामिण) उमेश मुंडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हा कृषी अधिक्षक यांच्याकडे केली आहे. 

जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून सतत नैसर्गीक संकटाचा सामना करत आहे. अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा या वर्षीच्या हंगामासाठी देण्यात आलेले महागामोलाचे सोयाबीनचे बियाने बोगस निघाले. अगोदरच कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पोटाला पीळ देऊन पेरणी केली. मात्र पेरलेले सोयाबीनचे बियाने निघाले नाही. त्यामुळे शेतकरी खचुन गेला आहे. 

हे उघडून तर पहाचांगली बातमी: शिधापत्रिकाधारकांना तांदुळ, अख्ख्या हरभऱ्याचे मोफत वितरण

तातडीने नुकसानीचे पंचनामे करा

आता त्याच्याकडे दुबार पेरणीपुरतेसुध्दा त्राण राहिले नाही. या सर्व परिस्थितीला सोयाबीन बियाने तयार करणाऱ्या कंपन्या व त्यांचे जिल्हास्तरावर असलेले अधिकृत व्यापारी हेच जबाबदार असल्याचा आरोप श्री. मुंडे यांनी केला आहे. सोयाबीन न निघालेल्या शेतावर जावून तातडीने नुकसानीचे पंचनामे करा, त्यांना आर्थीक मदत करा, दुबार पेरणीसाठी दर्जेदार सोयाबीनचे बियाने मोफत द्या अशी मागणी करण्यात आली आहे. 

जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करु

एवढेच नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास अशा बोगस कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप करत अशा कंपन्यावर कारवाई झाली नसल्यास शिवसेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करु असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे यांनी दिला आहे. निवेदनाची दखल जिल्हा कृषी कार्यालयाने घ्यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करु असेही श्री. मुंडे यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे. यावेळी शिष्टमंडळात सुनिल जाधव, श्री. स्वामी यांची उपस्थिती होती.  

हेही वाचा -  Video : आर्थिक अडचणीच्या फेऱ्यात कलावंत, कसे? ते वाचाच

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आ. पडळकर यांचा निषेध

नांदेड : राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांचा ग्रामिण राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.

यांची होती उपस्थिती 

यावेळी बाळासाहेब भोसीकर, दासराव पुयड, रूपेश नामलकोंडा, आंबरिश परिहार, अमित कासलीवाल, सुरज पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाथ्यक्ष श्रीकांत मांजरमकर म्हणाले की आदरनीय शरदचंद्रजी पवार हे देशाचे आदरणीय व्यक्तिमत्व आहे देशावर राज्यावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी सक्षमपणे भूमिका मांडून संकटातून बाहेर काढण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. 

येथे क्लिक करा धक्कादायक : नांदेडचा ‘हा’ आमदार पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या पोहचली ३४८ वर

देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये योगदान

भाजप पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा पावसाहेबांची त्यांनी केलेल्या विविध कामाबद्दल देशातील जनते समोर स्तुती केलेली आहे, अखंड ५० वर्षे त्यांचे देशाच्या व राज्याच्या विकासामध्ये योगदान दिले.आ गोपीचंद पडळकर यांनी प्रसिद्धीच्या हवेसे पोटी बेताल वक्तव्य करून आपला मूर्खपणा जनतेसमोर उघड केला. पवार यांनी कधीच जातीपातीचे राजकारण न करता सर्व जाती धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं आहे.
 

loading image