esakal | नांदेडकरांनो काळजी घ्या; शुक्रवारी १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

गुरुवारी (ता. चार) स्वॅब तपासणी करीता घेण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी (ता. पाच) दोन हजार ६० अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार ९१० निगेटिव्ह, १२८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५९ इतकी झाली आहे.

नांदेडकरांनो काळजी घ्या; शुक्रवारी १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड - दिवसागणीक कोरोनाची जिल्ह्यातील आकडेवारी वाढत आहे. यात मागील दोन दिवसात शहरी भागातील पॉझिटिव्ह संख्या अधिक आहे. शुक्रवारी दिवसभरात ९६ रुग्ण कोरोनामुक्त, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू तर प्राप्त झालेल्या अहवालात १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सावधान काळजी घ्या अशी म्हणायची वेळ आली आहे. 

जिल्ह्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या सहवासातील व्यक्तींचे गुरुवारी (ता. चार) स्वॅब तपासणी करीता घेण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी (ता. पाच) दोन हजार ६० अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार ९१० निगेटिव्ह, १२८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २४ हजार १५९ इतकी झाली आहे. शहरातील भावसार चौकातील पुरुष (वय ५०) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत कोरोना आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या ६०४ वर पोहचली आहे. 

हेही वाचा- अंगणवाडी सेविकेच्या पतीची आत्महत्या; तिघांविरुद्ध माळाकोळीत गुन्हा दाखल

१२२ स्वॅबची तपासणी सुरु 

शुक्रवारी नांदेड महापालिका क्षेत्रात - ६८, नांदेड ग्रामीण - पाच, देगलूर - सात, लोहा- तीन, मुदखेड - पाच, नायगाव - एक, भोकर - दोन, धर्माबाद - पाच, बिलोली - एक, किनवट - नऊ, माहूर - तीन, उमरी - एक, हिमायतनगर - दहा, मुखेड - तीन, हदगाव - तीन, यवतमाळ - एक, परभणी -एक असे १२८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या २४ हजार १५९ इतकी झाली असून, सध्या ७२९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी १९ जणांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत १२२ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

हेही वाचा- राहुल साळवे मारहाण प्रकरण: पाच रेल्वे पोलिसांवर न्यायालयात खटला दाखल होणार

नांदेड जिल्हा कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - २४ हजार १५९ 
एकूण कोरोनामुक्त रुग्ण - २२ हजार ६१२ 
एकूण मृत्यू - ६०४ 
शुक्रवारी पॉझिटिव्ह - १२८ 
शुक्रवारी कोरोनामुक्त - ९६ 
शुक्रवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - ७२९ 
गंभीर रुग्ण - १९ 
 

loading image