बहरलेल्या 'बहाव्या'चे सौंदर्य वेड लावणारे; यंदा दमदार पावसाचे संकेत

निसर्गातील प्राणी, पक्षी व वनस्पती भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेळोवळी संकेत देत असतात याला वैज्ञानिक आधार नसली तरी एक प्रचलित मान्यता आहे.
बहावा वनस्पती
बहावा वनस्पती

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : चैत्राचा महिना सुरु झाला की, निसर्गात अनेक प्रकारची झाडे बहरतात. त्यात भारतीय कुळातील पिवळ्या धमक फुलांचा (Yellow flowers) आणि पावसाचा इंडीकेटर (Rain started edicator) म्हणून परिचित असलेला बहावा यंदा बहरला असून बहरलेला मनमोहक बहावा (Golden showar tree) पाहतांना नेत्रसुख मिळते. बहावा बहरल्याने यंदा पाऊस चांगला पडणार असल्याचे यातून संकेत मिळत आहेत.

निसर्गातील प्राणी, पक्षी व वनस्पती भविष्यात घडणाऱ्या घटनांचा वेळोवळी संकेत देत असतात याला वैज्ञानिक आधार नसली तरी एक प्रचलित मान्यता आहे. पिवळ्या धमक फुलाने बहरलेल्या या झाडाला मराठीत 'बहावा' म्हणतात तर शास्त्रीय नाव 'कँशिला पिस्टूला' हे नाव त्याच्या शेंगावरुन पडले. असे असले तरी फुलांच्या सोनेरी रंगावरुन 'गोल्डन शोवर ट्री' म्हणूनही ओळखल्या जातो.

हेही वाचा - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षित वर्तन मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

पुर्वीच्या काळी पावसाचा अंदाज घेण्यासाठी कोणतेही साधने व अधुनिक यंत्रसामुग्री नव्हती की हवामान शास्त्रही नव्हते. निसर्गच पावसाचा अंदाज देत असे आणि आताही देतच आहे. उदाहरणार्थ कोंबडा आरवला की पहाट झाल्याचे आजही ग्रामीण भागात संकेत आहेत. त्याप्रमाणे निसर्गातील प्रत्येक झाड त्याला येणारी फुले, फळे हे विशिष्ट कालावधीतच येत असतात. ते वेगवेगळ्या ऋतूचे संकेत समजल्या जाते. त्यामुळे त्या काळी चैत्र महिण्यात बहरणाऱ्या विविध वनस्पतीच्या झाडावरुन पावसाचे संकेत मिळत असतात. यंदा बहावा सर्वत्र बहरला आहे. यावरुन यंदा पाऊस चांगला होईल असे संकेत मिळत आहेत.

आताच्या वैज्ञानिक युगात प्रगत तंत्रज्ञानामुळे प्रत्येक गोष्टीची पुर्व कल्पना मिळत असली तरी ग्रामीण भागातील शेतकरी अदिवासी समाज पाऊस वेळेवर येणार का उशीरा याचा अचूक अंदाज बांधतात. त्यामुळे अनादीकाळापासून निसर्गच नैसर्गिक बदलाचा व पावसाचा अंदाज देत असतात. बहावा हिवाळ्यात पर्णहीन असतो तर मार्च ते मे महिण्यात पुर्णतः फुलून येतो. यंदा बहावा मोठ्या प्रमाणात बहरला असल्याने अंगूरासारखे झुपकेदार पिवळ्या फुलांचे सौंदर्य वेड लावणारे आहे.

बहावा किती प्रमाणात बहरला यावरुन पाऊस किती प्रमाणात पडणार आहे याचा अंदाज बांधला जात असला तरी मोहाच्या झाडाला फुले यायला सुरुवात झाली की आदिवासी बांधवांना पावसाळ्याचे संकेत मिळत असतात. त्यामुळे निसर्गाने विविध झाडांचा जो वारसा दिला आहे ते ऋतूनुसार बदलात यातून मानवी जीवन सुकरच झाल्याचे आजपर्यंत दिसून आले. मात्र आता तरी माणून हा नैसर्गिक वारसा नष्ट करण्याच्या कामाला लागला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com