esakal | घरफोडीतील तीन चोरटे पोलिस कोठडीत; नांदेडच्या सिडकोत फोडले होते गोदाम
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ता. 16 मार्च सायंकाळी सात ते 17 मार्चच्या सकाळी अकराच्या सुमारास नांदेडच्या सिडको येथील एका तयार कपड्याच्या गोदामावर चोरट्यांनी हल्लाबोल केला.

घरफोडीतील तीन चोरटे पोलिस कोठडीत; नांदेडच्या सिडकोत फोडले होते गोदाम

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : एमआयडीसीच्या एका गोदामातून एकवीस लाख 57 हजार पाचशे रुपयांच्या रेडीमेड कपड्याचा माल लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना नांदेड ग्रामिण पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर गुरुवारी (ता. २५) हजर केले असता अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी चार दिवस पोलिस कोठडीत पाठवले आहे.

ता. 16 मार्च सायंकाळी सात ते 17 मार्चच्या सकाळी अकराच्या सुमारास नांदेडच्या सिडको येथील एका तयार कपड्याच्या गोदामावर चोरट्यांनी हल्लाबोल केला. या गोदामाचे मागील शटर वाकवून चोरट्यांनी 21 लाख 57 हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपास केला होता. इरफान खान यांच्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास गुन्हे शोध पथकाचे शेख असद यांच्याकडे देण्यात आला. चोरट्यांनी या ठिकाणी चोरी करताना सीसीटीव्ही फुटेज कापले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा शोध घेणे पोलिसांसमोर एक आव्हान होते.

हेही वाचा - 'त्यां'च्या आधारापासून ते स्मशानापर्यंतच्या समस्या ऐकून जेंव्हा जिल्हाधिकारी डॉ. विपीन हळवे होतात...

मात्र पोलिसांनी गुप्त माहितीवरुन आपला मोर्चा वळविला. वाघाळा येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचे नाव दिगंबर तुकाराम धुमाळे असून त्याने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानंतर दिगांबर धुमाळेला सोबत घेऊन पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता पाच गुन्हेगारांनी मिळून हा बेत आखला होता अशी माहिती दिली. आणि त्यानुसार पुढील चोरट्यांचाही त्यांने माग दाखविला. यात दिगंबर तुकाराम धुमाळे (वय 50) राहणार वाघाळा, नामदेव संभाजी मुंडे (वय 53) राहणार श्रीपादनगर कवठा आणि नर्सिंग रामकिशन ओझा रा. कलेजी टेकडी जुना मोंढा नांदेड या तिघांना पकडले.

ता. 25 मार्च रोजी या तिघांनाही फौजदार असद शेख यांनी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे. या गुन्ह्यातील नामदेव मुंडेविरुद्ध तेलंगणातील जहीराबाद आणि चंदननगर पोलिस ठाण्यात आणि दिगंबर धुमाळविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत.

loading image
go to top