नांदेडच्या आयुर्वेदिक महाविद्यालय रसशाळेत होणार तीनशे औषधींची निर्मिती 

शिवचरण वावळे
Monday, 28 September 2020

नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालयात राज्यातील एकमेव रसशाळा जिथे शंभर पेक्षा अधिक आयुर्वेदिक औषधींची निर्मिती होत असे, मात्र रसशाळेतील औषध निर्मिती साहित्य जुने झाल्याने रसशाळेला भंगार अवस्था आली होती. मात्र या रसशाळेला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होणार असून, भविष्यात या रसशाळेत तीनशे प्रकारच्या औषधींची निर्मिती व्हावी यासाठी रुग्णालय प्रशासनाने शानाकडून परवानगी घेतली आहे.

नांदेड - मागील अनेक वर्षांपासून शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील रसशाळा बंद होती. अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांच्या प्रयत्नामुळे बंद पडलेली रसशाळा पुन्हा एकदा सुरु झाली. सध्या या रसशाळेत २७ प्रकारची औषधी निर्मिती होत असून, रसशाळेत तीनशे प्रकारच्या औषधींची निर्मिती करण्यासाठी महाविद्यालयाने शासनाकडून परवानगी घेतली असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

राज्यातील एकमेव असलेल्या नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय तथा रुग्णालयातील रसशाळेत कधीकाळी शंभरपेक्षा अधिक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींची निर्मिती होत असे. परंतू, औषधी तयार करण्यासाठी लागणारे यंत्र वीस पंचवीस वर्ष जुने झाल्याने हळुहळु ही औषध निर्मिती रसशाळा बंद होत गेली. रसशाळेत औषध निर्मिती बंद असल्याने रसशाळेतील कर्मचाऱ्यांच्या हाताला कुठलेही काम नसताना देखील या कर्मचाऱ्यांना बसून पगार द्यावा लागत असे. 

हेही वाचा- गुन्हेगारीच्या नासुराचे आॅपरेशन करणार- एसपी प्रमोदकुमार शेवाळे ​

सध्या २७ प्रकारच्या औषधांची निर्मिती

अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रसशाळा सुरु करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर रसशाळेसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्या शासनाकडून पुरविण्यासाठी हापकीन या कंपनीकडे यंत्र सामग्री खरेदीसाठी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर काहीदिवसापूर्वीच हापकिनकडून शासकीय महाविद्यालयाच्या रसशाळेसाठी लागणारे साहित्य पुरवठा करण्यात आला असून, सध्या २७ प्रकारच्या औषधांची निर्मिती करण्यात येत आहेत.

हेही वाचा- दुर्दैवी घटना : उमरी शिवारात मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

सव्वातीनशे प्रकारचे आयुर्वेदिक औषधांची निर्मिती होणार 

नांदेडच्या शासकीय आयुर्विदिकच्या रसशाळेतून उत्पादित होणारे आयुर्वेदिक औषधे राज्यातील विविध जिल्ह्यातील आयुर्वेदिक रुग्णालयास पुरविण्यात येतात. त्यामुळे त्यातून आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या रसशाळेचा पुन्हा एकदा गवगवा निर्माण झाला असून, लवकरच या रसशाळेत तीनशे ते सव्वातीनशे प्रकारचे आयुर्वेदिक औषधांची निर्मिती सुरु होणार असल्याचे समजते. 

औषधी तयार करण्यासाठी शासनाकडून मान्यता 
आयुर्वेदिक औषधी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हापकीकडून प्राप्त होत आहे. त्यानुसार महाविद्यालयातील रसशाळेत आयुर्वेदिक औषधांची निर्मिती केली जाणार आहे. जवळपास सव्वातीनशे प्रकारचे औषधी तयार करण्यासाठी शासनाकडून मान्यता मिळाली आहे. 
- डॉ. यशवंत पाटील, अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred medicines will be manufactured at the Ayurvedic College Rasshala in Nanded Nanded News