esakal | नांदेडला शनिवारी तिघांचा मृत्यू;११ जण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

वजिराबादच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह अहवाला नंतर मृत्यू  
शनिवारी (ता.११) मृत्यू झालेली महिला (वय ३३) भोकर येथील तेलीगल्ली, गांधी चौक येथील रहिवासी असून, बहिमपुरा नांदेड येथील पुरुष (वय २८) व वजिराबाद येथील याचा अहवाल गुरुवारी (ता. नऊ) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी (ता.११) दिवसभरात  तिघांचा मृत्यू झाला

नांदेडला शनिवारी तिघांचा मृत्यू;११ जण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात शनिवारी (ता.११) सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पहिल्यांदाच एका ३३ वर्षीय महिलेचा, तर २८ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर दुपारी चारच्या दरम्यान तिसऱ्या पुरुष (वय ६४ ) बाधीत व्यक्तीचा मृत्यू आणि दिवसभरात ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर यांनी रात्री उशिराने माहिती दिली. 

मागील साडेतीन महिन्यांत जिल्ह्यातील सहा महिन्यांच्या बालकापासून ते ७० वर्षांच्या महिला-पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. अनेकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांपैकी पन्नास वर्षांपुढील बाधित रुग्णांचे उच्चरक्तदाब, दमा, मधुमेह अशा गंभीर स्वरूपाचे आजार असल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते; परंतु शनिवारी (ता.११) मृत्यूची नोंद झालेली महिला व पुरुष तरुण असून, इतक्या तारुण्यात कोरोनामुळे मृत्यू होणारे हे दोघे पहिलेच रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. 

हेही वाचा- संचारबंदी म्हणजे संचारबंदीच, उल्लंघन केल्यास...विजयकुमार मगर ​
वजिराबादच्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह अहवाला नंतर मृत्यू  
शनिवारी (ता.११) मृत्यू झालेली महिला (वय ३३) भोकर येथील तेलीगल्ली, गांधी चौक येथील रहिवासी असून, बहिमपुरा नांदेड येथील पुरुष (वय २८) व वजिराबाद येथील याचा अहवाल गुरुवारी (ता. नऊ) पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शनिवारी (ता.११) दिवसभरात  तिघांचा मृत्यू झाला. दुपारी मृत्यू झालेल्या वजिराबाद येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा शनिवारीच पॉझिटिव्ह अहवाला अल्यानंतर काही तासाच्या अंतराने त्याचा मृत्यू जाला. दिवसभरात बाधीत रुग्णसंख्या अकराने वाढली आहे.  

अकरा रुग्ण या भागातील 

वाढलेल्या रुग्णांमध्ये बिलोली येथील नागनी - पुरुष (वय ३०), बिलोली कुंडलवाडी - पुरुष (वय २६), वजिराबाद - पुरुष (वय ६४), भोकर तेलीगल्ली गांधीचौक - महिला (वय ३३), देगलूर नाका वाल्मीक गल्ली - पुरुष (वय ४४), मुखेड नगरपालिकेजवळच्या दोन महिला (वय ३०, ४५), मुखेड बाजार मोहल्ला - पुरुष (वय ४०), बळिरामपूर दूध डेअरी - पुरुष (वय २८), देगलूर भायेगाव - महिला (वय ३६) व तेरी बोर - पुरुष (वय ३२) या अकरा पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा- Video- आश्‍चर्य: एका कसायाच्या तावडीतून सोडून दुसऱ्या कसायाच्या दावणीला..​

१८० बाधित रुग्णांवर उपचार सुरू 

शुक्रवारी (ता. दहा) मागील २४ तासांत ३४ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. यात शनिवारी ११ बाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५६९ झाली असून, 361 बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता २८ इतकी झाली. १८० बाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भोसीकर यांनी सांगितली. 

नेमका मृत्यू कधी झाला याची चर्चा 

शनिवारी (ता.११) सकाळी तासाभराच्या अंतराने दोघांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी, दोन्ही बाधित रुग्णांचा मृत्यू शुक्रवारी झाल्याचे अनेकांचे मत आहे. दोन रुग्णांच्या मृत्यूची माहिती उशिराने दिल्याने उलटसुलट चर्चा सुरू असून, दुपारी चारच्या सुमारास मृत्यू झालेल्या तिसऱ्या रुग्णाच्या मृत्यूची माहिती देखील रात्री उशिराने दिली गेली. याबद्दल कुणीही बोलण्यास तयार नाही. त्यामुळे मृत्यूची माहिती उशिराने देण्यामागील गौडबंगाल काय आहे, अशी चर्चा सुरू आहे. 
 
 

loading image
go to top