गुरुवारी ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, ४५ जण कोरोनामुक्त 

file Photo
file Photo

नांदेड - कोरोना आजारावर प्रभावी लस आल्यापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. गुरुवारी (ता. २८) गंभीर रुग्णापेकी दिवासभरात एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा ५८४ वर स्थिर आहे. बुधवारी (ता.२७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी गुरुवारी एक हजार ४८९ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार ३१४ अहवाल निगेटिव्ह, ३८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २२ हजार ४१६ इतकी झाली आहे. 

गुरुवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - चार, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण कक्षातील - २८, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - तीन, मुखेड- एक, देगलूर - एक, हदगाव- एक आणि खासगी रुग्णालय - सात असे ३८ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आली आहे. जिल्हा भरातील आतापर्यंत २१ हजार ३१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर

 गुरुवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील २५, नांदेड ग्रामीण - तीन, किनवट - एक, अर्धापूर - तीन, मुखेड - दोन, परभणी - एक, जालना - एक व हिंगोली - एक असे ४५ कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. सध्या ३१५ बाधितांवर उपचार सुरू असून, त्यापैकी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

३९५ स्वॅबची तपासणी सुरु 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - १६, जिल्हा शासकीय रुग्णालय - १३, जिल्हा शासकीय रुग्णालय नवीन इमारत - नऊ, महसूल भवन कोविड केअर सेंटर - १६, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण - १९६, मुखेड - नऊ, किनवट - दोन, देगलूर - चार, तालुकांतर्गत गृहविलगीकरण कक्षात - ३९ व खासगी रुग्णालयात - ११ असे जिल्हाभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३१५ इतकी असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह - २२ हजार ४१६
एकूण कोरोनामुक्त- २१ हजार ३१४
एकूण मृत्यू- ५८४ 
गुरुवारी पॉझिटिव्ह - ३८ 
गुरुवारी कोरोनामुक्त - ४५ 
गुरुवारी मृत्यू - शुन्य 
उपचार सुरु -३१५
गंभीर रुग्ण - नऊ 
स्वॅबतपासणी सुरु - ३९५
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com