नांदेड : लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई

प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या सूचना
नांदेड : लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई
नांदेड : लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई sakal

नांदेड : जिल्ह्यात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी कोरोना लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांची वाहतुक करू नये अन्यथा दंड आकारण्यात येईल, असे आवाहन सर्व खासगी व सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा पुरविणाऱ्या सर्व वाहनचालक, मालकांना प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

राज्य शासनाने कोरोना रोगाचा प्रसार होऊ नये, म्हणून याबाबत नवीन नियमावली जाहीर केली आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक निर्गमीत केले आहे. जगात सध्या कोरोनाचा नवीन धोकादायक व्हेरीएंट ओमीक्रोनचे संकट असून त्याच्या वाढत्या प्रभावास तोंड देण्यासाठी १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण वेळेत होणे अत्यंत आवश्यक आहे.

नांदेड : लसीकरण प्रमाणपत्राशिवाय प्रवाशांच्या वाहतुकीला मनाई
CSK Player Retention : चेन्नईने धोनीपेक्षा जाडेजासाठी मोजली मोठी किंमत

सार्वजनिक, खासगी वाहनांतून प्रवास करण्यासाठी १८ वर्षावरील सर्व वाहनचालक, मालक व प्रवासी यांनी त्यांचे कोवीड लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक पुरविणाऱ्या वाहन मालकांनी कोवीड अनुरूप वर्तनाचे पालन केले नाही तर कसूर करणाऱ्यास व सेवा पुरवठादार यांना पाचशे रुपये इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्या बाबतीत कसुरीच्या प्रत्येक प्रसंगी दहा हजार रुपये इतका दंड आकारण्यात येईल.

वारंवार या कर्तव्यात कसूर होत असेल तर कोविडची अधिसूचना अंमलात असेपर्यंत मालक एजन्सीचे लॉयसन्स काढून घेण्यात येईल किंवा तिचे परिचालन किमान दोन दिवस बंद करण्यात येईल. याची दक्षता सर्व खासगी तसेच सार्वजनिक प्रवासी वाहन सेवा (ऑटोरिक्षा/ टॅक्सी / बस / जीप टाईप वाहने इत्यादी) पुरविणाऱ्या सर्व वाहन चालक, मालक व प्रवासी यांनी घ्यावी, असेही आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com