
या शासन प्रणालीमध्ये रक्तपाताशिवाय बदल घडवून आणणे आवश्यक आहे.
बिलोली (जिल्हा नांदेड) : या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर विरांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली. तेव्हा कुठे स्वातंत्र्य मिळाले. याची जाण सर्वानी ठेवणे आवश्यक आहे. आता मोठ्या कष्टाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी कांही वेळा आपल्या जवानांना रक्त सांडावे लागत आहे हे साजेसे नसून या शासन प्रणालीमध्ये रक्तपाताशिवाय बदल घडवून आणणे आवश्यक आहे. हेच भारतीय लोकशाहीला अपेक्षित आहे. असे प्रतिपादन बिलोली येथील जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी केले आहे.
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (ता. २६) बिलोली येथील गंगा गिरजा बहुउद्धेशीय सेवाभावी संस्था व तहसिल प्रशासनाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्राम पंचायत निवडणूकीत चांगली कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार यांना गौरविण्याचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी तेबोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार कैलासचंन्द्र वाघमारे हे होते. तर प्रमुख उपस्थितीत गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, नायब तहसीलदार डाॅ. ओमप्रकाश गोंड, नायब तहसीलदार आर. जी. चौहाण, अनिल परळीकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास केंद्रे, पोलिस उपनिरीक्षक वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा - वाहनधारकांना ईशारा : वसमतमध्ये चक्क यमराज रस्त्यावर उतरले; रस्ता सुरक्षा अभियान
न्यायमुर्ती मांडे आपल्या भाषणात निवडणूक प्रक्रिया पार पाडणे कसे अवघड असते, विशेषतः महसुल व पोलिस प्रशासनास वेळप्रसंगी किती त्रास सहन करावा लागतो. यामध्ये पत्रकारांची भूमिकासुध्दा महत्वाची असते. या बाबत सविस्तर माहिती दिली. सोबत या गंगा गिरजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष त्र्यंबक पाटील सावळीकर, उपाध्यक्ष चंद्रकांत कनशेट्टे, सचिव श्री. चंदनकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा कार्यक्रम आयोजित करुन कष्टाळू अधिकारी कर्मचारी व पत्रकार यांचा जो गौरव केला त्याबद्दल न्यायमुर्तीनी त्यांचे कौतुक केले.
यावेळी तहसीलदार कैलासचंन्द्र वाघमारे, गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, नायब तहसिलदार डाँ. ओमप्रकाश गोंड, सहाय्यक पोलिस निरिक्षक रामदास केंन्द्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचलन प्रा. गोपाळ चौधरी यांनी केले तर आभार व्ही. जी. चंदनकर यांनी मानले.
संपादन- प्रल्हाद कांबळे