विजेच्या धक्क्याने दोन घटनेत दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

विजेचा धक्का बसुन उमरी तालुक्यात एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील धावरी येथे आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) घडली.

नांदेड  : विजेचा धक्का बसुन उमरी तालुक्यात एका तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत लोहा तालुक्यातील धावरी येथे आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) घडली.

बहिणीच्या भेटीला गेल्या भावाचा झाला मृत्यू
उमरी तालुक्यातील अस्वलदरी येथे राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा येथील गजानन मरीबा वाघमारे (वय ३०) गेला होता. दरम्यान अंगणातील विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) सकाळी नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी मानेजी झरीबा वाघमारे (रा. पिंपळकौठा) यांच्या माहितीवरून उमरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार श्री अटकोरे करीत आहेत. 

हेही वाचा.....अखेर शिधापत्रिका नसलेल्यांना मिळाला आधार....कसा तो वाचा

खेळणाऱ्या मुलाचा झाला गेटला स्पर्श
लोहा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या धावरी येथे घडली. नादीजी शिवराज जाधव (वय आठ, रा. चिंचोली ता. लोहा) मुलगा भगवान गोविंदराव पवार यांच्या शेतात खेळत होता. यावेळी लोखंडी गेटमध्ये विद्युतपुरवठा उतरल्याने त्यास स्पर्श होवून त्यास विजेचा धक्का बसला. यातच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गणेश धनाजी कल्याणकर यांच्या माहितीवरून लोहा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचेलच पाहिजे.....सलग पावसाने शेतकरी सुखावला

पाणी भरण्याच्या कारणावरून मारहाण
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातंर्गत येणाऱ्या राहुलनगर (वाघाळा) येथे पाणी भरण्याच्या कारणावरून मुलीला मारहाण केली. याबाबत जाब विचारला असता आपणासही डोक्यात मारून डोके फोडले. तसेच डाव्या पायावर मारून फॅक्चर केल्याची तक्रार संजय पद्माकर कांबळे यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात केली. ही घटना शनिवारी (ता. सहा) रात्री साडेआठच्या सुमारास घडली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक श्री. कवठेकर करीत आहेत.

एंशी हजाराचे टिनपत्रे चोरले
शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या वसंतनगर येथे येथील घर स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या आदेशाने जप्त केले आहे. या घरावरील एंशी हजाराचे टिनपत्र चोरून नेल्याची घटना ता. १२ डिसेंबर २०१९ ते  ता. पाच जूनच्या दरम्यान घडली. याप्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक जितेंद्र गोविंद मोरे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two died in two incidents due to electric shock