नांदेड जिल्ह्यात बुधवारी दोन जण झाले कोरोनामुक्त

१९ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू; दोघांची प्रकृती गंभीर
corona virus
corona virussakal

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ५५८ अहवालापैकी एकाही संशयीत व्यक्तीचा अहवाल कोरोनाबाधित आला नाही. त्यामुळे बुधवारी (ता.२०) पर्यंत जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार ३६३ एवढ्यावर स्थिर आहे. यातील ८७ हजार ६९२ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १९ रुग्ण उपचार घेत असून दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५२ एवढी आहे. आज जिल्ह्यातील-दोन कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी - एक, मनपाअंतर्गत एन.आर.आय.भवन व गृह विलगीकरण एक असे एकूण दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज १९ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी-दोन, किनवट कोविड रुग्णालय- एक, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण १६ व्यक्ती उपचार घेत आहेत.

नांदेड कोरोना मीटर

  1. एकूण पॉझिटिव्ह : ९०,३६३

  2. एकूण कोरोनामुक्त : ८७,६९२

  3. एकूण मृत्यू : २,६५२

  4. बुधवारी पॉझिटिव्ह : शुन्य

  5. बुधवारी कोरोनामुक्त : दोन

  6. बुधवारी मृत्यू : शुन्य

  7. उपचार सुरू : १९

  8. अतिगंभीर प्रकृती : दोन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com