दुचाकी चोरट्यांकडून सहा दुचाकीसह साडेतीन लाखाचा ऐवज जप्त- नांदेड पोलिस 

प्रल्हाद कांबळे | Tuesday, 28 July 2020

दुचाकी व मोबाईल चोरटे तसेच घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार आपले काळे कारनामे करत आहेत. मात्र त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असून रात्रीच्या व दिवसाच्या नाकाबंदीत किंवा गस्त दरम्यान अनेक गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत.

नांदेड : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पोलिस यंत्रणा बंदोबस्त कामी रस्त्यावर उभी असल्याचे संधी साधून दुचाकी व मोबाईल चोरटे तसेच घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार आपले काळे कारनामे करत आहेत. मात्र त्यांच्यावर पोलिसांची करडी नजर असून रात्रीच्या व दिवसाच्या नाकाबंदीत किंवा गस्त दरम्यान अनेक गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकत आहेत.

शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चोरांची टोळी सोमवारी (ता. २७) सायंकाळी जेरबंद केली असून त्यांच्याकडून सहा दुचाकी व एख सोन्याचे गंठण असा तीन लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त केला. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या गुन्ह्यांसदर्भात व दाखल गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवि वाहूळे यांनी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फस्के आणि पोलिस निरीक्षक अनंत नरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या हद्दीमध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली.

शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाची कामगिरी

संचारबंदी सुरु असल्याने पोलिस प्रत्येक ठिकाणी बंदोबस्त कामी हजर आहे. या कामासोबतच गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पाहिजे व फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी श्री. वाहूळे हे पोलिस हवालदार प्रदीप जमदाडे, संजय मुंडे, दिलीप राठोड, रामकिशन मोरे, शिलराज ढवळे,  शेख दुर्रानी, प्रकाश मामुलवार, विशाल अटकोरे, शिवलाजी इंगोले, काकासाहेब जगताप आणि राजकुमार डोंगरे आणि केंद्रे या आपल्या सहकाऱ्यांसोबत गस्त घालत होते. त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन सोमवारी (ता. २७) सायंकाळी शेख सलीम शेख अब्दुल रज्जाक आणि शिवाजी उर्फ शिवा पुंडलीक डूबुकलाड (वय २५) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीच्या सहा दुचाकी एका ठिकाणी लावलेव्या काढून दिल्या. त्यांच्याकडून अजून काही दुचाकी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहराच्या पटेलनगर येथून एका कुरीयरवाल्यांची दुचाकी चोरली होती. तीही दुचाकी पोलिसांनी जप्त केली.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील शासकीय आरोग्यसेवा बळकट करा- डावी आघाडी व नागरी विकास समितीची मागणी

हे आहेत मोबाईल चोरटे

पोलिसांनी शेख सलिम शेख अब्दुल रज्जाक आणि शिवाजी उर्फ शिवा डुबूकवाड यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा दुचाकी व एक सोन्याचे गंठण असा तीन लाख ४४ हजाराचा ऐवज जप्त केला. तपास श्री. पांचाळ करत आहेत.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चारही चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा

सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी वाव्हुळे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर पोलिस ठाण्यात वरील दोन्ही दुचाकी चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकाने पाच दिवसापूर्वीच चार चोरट्यांनी अटक करुन त्यांच्याकडून ३१ मोबाईल आणि सोन्याचे दागिणे असा सव्वातीन लाखाचा ऐवज जप्त केला होता. या दोघांनाही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम वर्ग न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे.