सेफ्टी टँकमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, मुखेडमधील दुर्घटना

सेफ्टी टँकमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, मुखेडमधील दुर्घटना

मुखेड (जि. नांदेड) : येथील (Mukhed) अशोकनगर भागात प्रा. तुकाराम सुर्यवंशी यांच्या घरातील स्वच्छतागृहाचे सेफ्टी टँक (Safety Tank) साफ करताना गुदमरून नागेश घुमलवाड (वय २५) आणि मारोती चोपलवाड (३०) या कामगारांचा मृत्यू झाला. रविवारी (ता. १९) रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँक साफ करण्याचे काम फुलेनगर येथील पाच कामगारांनी (Nanded) ठेका पद्धतीने घेतले. त्यानुसार दुपारी त्यांनी काही काम केले व उर्वरित रात्री सुरू केले. रात्री साडेदहाच्या दरम्यान शिडीच्या मदतीने नागेश घुमलवाड टॅंकमध्ये उतरत असताना कोसळले. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात मारोती चोपवाड हेही टॅंकमध्ये पडले. दोघांना टॅंकबाहेर काढण्यासाठी उर्वरित तीन कामगारांनी प्रयत्न केले.


सेफ्टी टँकमध्ये गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू, मुखेडमधील दुर्घटना
लोअर दूधना धरणाची चौदा दरवाजे उघडले; वाहतूक ठप्प, शेतीचे नुकसान

पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहायक निरीक्षक संतोष केंद्रे, योगेश महिंद्रकर, पोलिस शिपाई प्रदीप शिंदे, गंगाधर चिंचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन सेफ्टी टँक उपसणारा टॅंकर मागविला. टॅंकमध्ये गुदमरून मरण पावलेल्या दोघांचे मृतदेह आज सकाळी सातला बाहेर काढून उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. येथील पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून निरीक्षक विलास गोबाडे, सहायक निरीक्षक संतोष केंद्रे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com