esakal | अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Two youths traveling on a motorcycle to Marwali village were killed on the spot when a vehicle hit them from behind.

अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरुन मरवाळी येथे जाणारे दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना (ता. ५) रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान नांदेड नरसी रोडवर तहसील कार्यालयाच्या जवळ घडली. सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव  (नांदेड)  : अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने मोटरसायकलवरुन मरवाळी येथे जाणारे दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना (ता. ५) रोजी रात्री १ वाजताच्या दरम्यान नांदेड नरसी रोडवर तहसील कार्यालयाच्या जवळ घडली. सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
 
तालुक्यातील मरवाळी येथील माधव रघुनाथ वगवाड आणि माधव हानमंत इबितदार यांच्यासह अन्य चारजण कौठा पाटी येथे मरवाळी येथील एका व्यापाऱ्याने खरेदी केलेले सोयाबीन भरण्यासाठी (ता. ४) रोजी रात्री उशिरा गेले होते. सोयाबीन भरल्यानंतर सर्वजण परत आपापल्या मोटारसायकलवरुन मरवाळीकडे रात्री एक वाजताच्या दरम्यान परत येत असताना एम.एच.२६ ए.वाय. ५११७ या क्रमांकाच्या दुचाकीला तहसील कार्यालयाजवळ नांदेड कडून येणाऱ्या अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली. यात माधव  वगवाड आणि माधव इबितदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे.  
 
वाहन चालकाने धडक दिल्यानंतर दोघांच्याही अंगावरून भरधाव वेगाने गाडी पळवली. त्यामुळे शरीराचा चेंदामेंदा झाला आहे. दोनही मयताचे उत्तरीय तपासणी करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची घटना ता. ५ नोव्हेंबर च्या १ वाजताच्या दरम्यान नांदेड ते नायगांव महामार्गावर घडली आहे. मारोती शंकर इबितदार यांच्या फिर्यादीवरूण आज्ञात वाहनावर व चालकावर नायगांव पोलीस ठाण्यात कलम ३७९,३०४ (अ) भादवी ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी दिली आहे. हमाली व मोलमजुरी करुन आपले कुटुंब चालवणाऱ्या दोन तरुणावर काळाने घाला घातल्याने मरवाळी येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले