esakal | नांदेडातही आता पोस्टर ऑडिटचा उल्हासनगर पॅटर्न- एसपी शेवाळे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरम्यान सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शलला सक्रीय करुन गुन्हेगारांची दररोज तपासणी करण्याच्या सूचनाही श्री. शेवाळे यांनी ठाणेप्रमुखांना दिल्या आहेत.

नांदेडातही आता पोस्टर ऑडिटचा उल्हासनगर पॅटर्न- एसपी शेवाळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहरातील प्रमुख रस्त्यांवर होर्डिंग व पोस्टर्स लावून विद्रुपीकरण कायद्याचा भंग करणार्‍याविरुद्ध कारवाईसाठी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पोस्टर व होर्डींग्ज आॅडिटचा उल्हासनगर पॅटर्न सुरु केला आहे. दरम्यान सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शलला सक्रीय करुन गुन्हेगारांची दररोज तपासणी करण्याच्या सूचनाही श्री. शेवाळे यांनी ठाणेप्रमुखांना दिल्या आहेत.

पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे हे ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे कार्यरत असताना त्यांनी पोस्टर ऑडिट पॅटर्न सुरु कोला होता. त्याचा पोिस विभागाला चांगला फायदाही झाला. शहरात लावलेल्या होर्डींग्ज व पोस्टरवर छापण्यात आलेल्या कार्यकर्त्यांचे नाव एखाद्या गंभीर स्वरुपाचे आहे काय किंवा त्यांच्यावर कोणते गुन्हे यापूर्वी दाखल आहेत का याची माहिती गोळा करुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते. त्यानुसार पोलिस दलातून काम सुरु करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून पोलिसांचा ससेमिरा नको रे बाबा म्हणण्याची वेळ आल्याने गेल्या काही दिवसात पोस्टरबाजीला बराच आळा बसल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचाश्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानात सर्वधर्मियांचा सहभाग

बीट मार्शलला केले ऍक्टिव्ह 

पोलिस ठाणे स्तरावर सर्व बीट मार्शलला पुन्हा एकदा ऍक्टिव्ह करण्यात आले आहे. त्यांच्या माध्यमातून विशेष रात्रीची गस्त वाढवून दररोज गुन्हेगारांची तपासणी करावी तसेच बँका, सराफा लाईन, बाजारपेठ व अन्य महत्त्वाच्या ठिकाणी रजिस्टर ठेवून गस्तीवर असणार्‍या पोलिसांची त्यावर हजेरीसाठी स्वाक्षरी घेतली जाणार आहे. घरफोडी तसेच इतर गुन्ह्यातील आरोपींची रात्रगस्त यावेळी कसून तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी दिली. 

loading image