नांदेड जिल्हा रुग्णालयात सिंगापूरचे ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर वापरा- अशोक चव्हाण

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सीजनचे उत्पादन आणि साठवणुकीची क्षमता वाढवली जाते आहे.
constrettar
constrettar

नांदेड : राज्य शासनाने येथील जिल्हा रुग्णालयाला (district hospital) सिंगापूरचे 10 ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर (oxygen constrator) उपलब्ध करुन दिले आहेत. हे कॉन्स्ट्रेंटर तातडीने रुग्णसेवेसाठी वापरण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण (Gardian minister Ashok chavan) यांनी प्रशासनाला दिले आहेत. Use Singapore's Oxygen Concentrator at Nanded District Hospital - Ashok Chavan

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात ऑक्सीजनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ऑक्सीजनचे उत्पादन आणि साठवणुकीची क्षमता वाढवली जाते आहे. दरम्यान, या आणिबाणीच्या परिस्थितीत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी मदतीचा हात पुढे केला असून, सिंगापूरच्या टेमासेक फाऊंडेशन या संस्थेने राज्य शासनाला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध करुन दिले आहेत. त्यापैकी 10 कॉन्स्ट्रेंटर नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत. या सहकार्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जपणे आवश्यक असून कोरोनाबाबतची काळजी व सुरक्षित वर्तन मुलांकडूनही होणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर तातडीने योग्य उपचार सुरु व्हावेत, त्यांची बेड, ऑक्सीजनसाठी धावपळ होऊ नये, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेऊन नांदेड येथे तत्परतेने कोविड केअर सेंटर उभारले. त्याशिवाय एसडीआरएफमधून जिल्ह्याला 52 नव्या रुग्णवाहिका मिळवून दिल्या. त्यानंतर आता जिल्ह्याला नवे दहा ऑक्सीजन कॉन्स्ट्रेंटर उपलब्ध झाल्याने रुग्णांसाठीच्या सुविधांमध्ये वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com