esakal | कुख्यात विक्की चव्हाण याच्यावर होते ‘एवढे’ गुन्हे,वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तिसऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केले आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर मंगळवारी (ता. चार) हजर केले. यावेळी न्यायालयाने केशव नहारे याला ता. आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे.

कुख्यात विक्की चव्हाण याच्यावर होते ‘एवढे’ गुन्हे,वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील कुख्यात व पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेल्या विक्की चव्हाण (वय २९) खून प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केले आहे. त्याला प्रथमवर्ग न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर मंगळवारी (ता. चार) हजर केले. यावेळी न्यायालयाने केशव नहारे याला ता. आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. या प्रकरणातील अटक दोन आरोपी या अगोदरच पोलीस कोठडीत आहे.

ता. दोन ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास नांदेड शहरापासून जवळच असलेल्या कामठा शिवारातील शंकरराव चव्हाण चौकाच्या पुढे बाबाराव जानोळे यांच्या आखाड्यासमोर गाडेगाव रस्त्यावर विक्की रामसिंग चव्हाण (वय २९) याच्या दुचाकीला मारेकऱ्यांनी आपल्या चारचाकी वाहनाची धडक देऊन खाली पाडले. त्यानंतर त्याच्यावर गोळीबार करून त्याचे अपहरण केले होते. त्यानंतर त्याचे अपहरण करुन त्याचा निर्घृणपणे खून केला. त्याचे डोळे फोडून व त्याच्या शरीराची चाळणी करुन मृतदेह पुरावा नष्ट करण्यासाठी पश्‍चिम रस्त्यावर हस्सापुर शिवारातील गोदावरी नदीच्या पुलाजवळ असलेल्या झुडपात फेकून दिला होता.

हेही वाचा  कोरोना : शासकिय योजनेतील रुग्णालयांचे, कोरोना बाधितांच्या उपचाराकडे दुर्लक्ष

केशव नहारेला पोलिस कोठडी

याप्रकरणी ता. तीन ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी मयत विक्की चव्हाण याच्या बहिणीने विमानतळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मारेकऱ्यांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील मारेकरी मुंजाजी बालाजी धोंगडे (वय २०) आणि सुशील मनोहर गावखोरे (वय २०) या दोघांना त्याच रात्री नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक करून तीन ऑगस्टला न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाने या दोघांनाही ता. आठ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले होते. हा गुन्हा विमानतळ पोलिसांच्या हद्दीत घडला असला तरी सर्वच पोलिस यंत्रणा आरोपींच्या शोधात कामाला लागली आहे. या पथकातील पोलिसांनी ता. तीन ऑगस्टच्या रात्री केशव शिवाजी नहारे (वय २३) राहणार शहीदपुरा, नांदेड या युवकाला अटक केली आहे. 

विक्की चव्हाणचा शेवट क्रुरपद्धतीने

पोलिस निरीक्षक संजय ननवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठवले आहे. या आरोपींकडून खून करताना परिधान केलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेला पिस्तूल कुठून आणला होता त्याची विचारपूस करायची आहे. तसेच अत्यंत क्रूरपणे प्राणघातक शस्त्रांनी डोक्यात चेहऱ्‍यावर, गळ्यावर, छातीवर, पोटावर गंभीर वार करून त्याच्या शरीराची चाळणी केली होती. यातील मुख्य आरोपी फरार आहे. त्याला अटक करावयाचे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी द्यावी असा युक्तीवाद सरकारी वकील ज्योती इंगळे यांनी केला. यावरुन न्यायाधीश प्रवीण कुलकर्णी यांनी केशव नहारेला ता. आठ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.

येथे क्लिक करा नांदेड शहरात चोरट्यांचा धुमाकुळ, एकाच रात्री तीन दुकाने फोडली

अनेक गुन्हे विक्की चव्हाणच्या नावे 

विक्की चव्हाण याच्यावर नांदेड शहरात विविध पोलिस ठाण्यात ११ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होते. ज्यात मोक्का, खून, खुनाचा प्रयत्न, विनापरवाना हत्यार बाळगणे, खंडणी, गंभीर दुखापत, विनयभंग, खूनानंतर पुरावे नष्ट करणे, दरोडा, जबरी चोरी अशा विविध प्रकारचे गुन्हे दाखल होते. त्यातील अनेक गुन्ह्यांचा निकाल न्यायालयात प्रलंबित असून त्याला दोन प्रकरणात हद्दपारही करण्यात आले होते. त्याच्यावर वजिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) लावण्यात आला होता. पोलिस अधीक्स्थाषक विजयकुमार मगर यांच्निया मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, एपीआय पांडूरंग भारती यांच्यासह आदी अधिकारी मारेकऱ्यांच्या शोधात आहेत.

loading image
go to top