प्रभाग समिती : बाल संरक्षण समितीद्वारे बालकांचे संरक्षण- विद्या आळणे

file photo
file photo

नांदेड : शासनाच्या निर्णयानुसार एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत शहरातील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून बालकांचे हक्क व संरक्षण होणार असून महिला व बालकांच्या अधिकारावर गदा येणार नाही यासाठी ही समिती कार्यरत राहणार आहे. आपल्या परिसरातील लहान बालकं किंवा निराधार मुलं यासाठी ही समिती कार्यरत असून समाजाच्या प्रत्येक घटकांनी बालकावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांनी केले.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती कार्य करते. समितीच्या सदस्य सचिव एस. बी. शिसोदे यांनी यासाठी पुढाकार घेतला. तसेच प्रभागाचे नगरसेवक व इतर सदस्यांना समिती स्थापनेबाबत माहिती दिली. या बैठकीला जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विद्या आळणे यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना बाल संरक्षण समितीच्या कामकाजाची माहिती दिली. समितीच्या बैठका दर तीन महिन्याला घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रभागात कार्यरत बाल संरक्षण समितीची स्थापना

यावेळी या प्रभागाचे नगरसेवक बाळू राऊत, सुनंदा पाटील, ज्योती कल्याणकर तसेच सामाजीक कार्यकर्ते विष्णू गोडबोले व रत्नमाला व्यवहारे यांची उपस्थिती होती. सदरील बैठकीत प्रभागाच्या सदस्यांच्या वतीने बाळू रावत यांची अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्वांनी बालकांच्या हक्क व संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार समिती प्रभागात स्थापन करण्यात आल्याचे विद्या आळणे यांनी सांगितले. या बैठकीला धनाजी कोंडेवाड, रघुनाथ बिच्छेवाड, नंदा जोंधळे, रेणुका बोले, छाया आठवले आदींची उपस्थिती होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com