बुधवारी 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, 43 जण कोरोनामुक्त  

शिवचरण वावळे
Wednesday, 27 January 2021

बुधवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - एक, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण कक्षातील - २७, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - पाच, मुखेड- दोन, देगलूर - दोन, हदगाव- एक आणि खासगी रुग्णालय - पाच असे ४3 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले.

नांदेड - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्यापेक्षा अधिक आहे. बुधवारी दिवासभरात एकही गंभीर रुग्ण दगावला नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा ५८४ वर स्थिर आहे. मंगळवारी (ता.२६) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी बुधवारी (ता.२७) एक हजार ४२३ अहवाल प्राप्त झाले. यामधील एक हजार ३१९ अहवाल निगेटिव्ह, ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या २२ हजार ३७८ इतकी झाली आहे. 

बुधवारी विष्णुपुरी शासकीय रुग्णालयातील - एक, मनपा अंतर्गत गृह विलगीकरण कक्षातील - २७, श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय - पाच, मुखेड- दोन, देगलूर - दोन, हदगाव- एक आणि खासगी रुग्णालय - पाच असे 43 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. जिल्हा भरातील आतापर्यंत २१ हजार २६९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

हेही वाचा-  Success Story : नांदेडची पूजा सैन्य दलातील आसाम रायफलमध्ये ​

३२२ बाधितांवर उपचार सुरू

बुधवारी नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रातील २३, नांदेड ग्रामीण - पाच, किनवट दोन, अर्धापूर - चार, हदगाव- सात, मुदखेड एक, भोकर एक, माहूर तीन, उमरी एक व यवतमाळ एक असे ४८ कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. सध्या ३२२ बाधितांवर उपचार सुरू असून, त्यापैकी नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. 

हेही वाचा- सरपंचपदाच्या आरक्षणासाठी अनेकांनी देव ठेवले पाण्यात ​

जिल्हाभरात ३२२ रुग्ण पॉझिटिव्ह 

विष्णुपुरी शासकीय रुग्णालय - १६, जिल्हा शासकीय रुग्णालय - १५, जिल्हा शासकीय रुग्णालय नवीन इमारत - १०, महसूल भवन कोविड केअर सेंटर - नऊ, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण - २०७, मुखेड - १०, किनवट - दोन, देगलूर - पाच, तालुकांतर्गत गृहविलगीकरण कक्षात - ३७ व खासगी रुग्णालयात - ११ असे जिल्हाभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२२ इतकी असून बुधवारी रात्री उशिरापर्यंत ३९६ स्वॅबची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर ः 

एकूण पॉझिटिव्ह - एक हजार ३७८ 
एकूण कोरोनामुक्त- २१ हजार २६९ 
एकूण मृत्यू- ५८४ 
बुधवारी पॉझिटिव्ह - ४८ 
बुधवारी कोरोनामुक्त - 43
बुधवारी मृत्यू - शुन्य 
उपचार सुरु -३२२ 
गंभीर रुग्ण - नऊ 
स्वॅबतपासणी सुरु - ३९६ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: On Wednesday, 48 people reported positive, 43 corona-free Nanded News