‘कम्युनिटी किचन’च्या समारोपात काय म्हणाले खासदार चिखलीकर...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

मागील ५८ दिवसांपासून नांदेड शहरात भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास २९ हजार लोकांना जेवण दिले असून नांदेड कम्युनिटी किचनचे कार्य गौरवास्पद आहे. त्याची प्रदेशच नव्हे तर केंद्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली असून नांदेडचे कम्युनिटी किचन राज्यात प्रथम असल्याचा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बुधवारी (ता. २०) केला. 

नांदेड - मागील ५८ दिवसांपासून नांदेड शहरात भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास २९ हजार लोकांना जेवण दिले असून नांदेड कम्युनिटी किचनचे कार्य गौरवास्पद आहे. त्याची प्रदेशच नव्हे तर केंद्रीय पातळीवर नोंद घेण्यात आली असून नांदेडचे कम्युनिटी किचन राज्यात प्रथम असल्याचा दावा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी बुधवारी (ता. २०) केला. 

नांदेडला सुरु असलेल्या कम्युनिटी किचनचा समारोप महारक्तदान शिबिराने करण्यात आला. या समारोप कार्यक्रमात खासदार चिखलीकर बोलत होते.
यावेळी किसान आघाडीचे राम आय्यर, वैद्यकीय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, मिलिंद देशमुख, माजी नगरसेविका अरुंधती पुरंदरे, दिलीप ठाकूर, अजयसिंह बिसेन, विजय गंभीरे, महादेव मठपती आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.

हेही वाचा - वृद्ध दांपत्याने केला लग्नाचा वाढदिवस रुग्णालयात साजरा...

रक्तदान शिबिराने समारोप
कम्युनिटी किचनची नोंद प्रदेश पातळीसह केंद्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. भाजपाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे देखील त्यात योगदान आहे. कम्युनिटी किचनसोबतच भाजपाने लॉकडाऊनच्या काळात एक लाख ८० हजार कुटुंबियांना धान्य वाटप केले. चार लाख लोकांना अन्न पुरविले तर मुख्यमंत्री निधीसाठी २७ लाख व प्रधानमंत्री निधीसाठी ९० लाख रुपये दिलेले आहेत.
कम्युनिटी किचनचा समारोप रक्तदान शिबीराने होत असून ही देखील महत्वाची मदत असल्याचे खासदार चिखलीकर म्हणाले.

भाजप संघाची शिकवण सेेवा
महानगराध्यक्ष प्रविण साले म्हणाले की, भाजपा संघाची शिकवण सेेवा असून मानवधर्म हा एकमेव धर्म आहे. कोरोना या वैश्वीक महामारीत आपल्या हातून सेवा घडावी, या हेतूने प्रदेश, केंद्रीय पातळीवरुन आलेल्या सुचनेनुसार नांदेडात कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले. खासदार चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेले कम्युनिटी किचन सुरुवातीला पोर्णिमानगर येथे कम्युनिटी किचनचे कार्यवाह कुणाल गजभारे यांच्या घरी जवळपास ३५ दिवस सुरु होते. त्यानंतर पंकज कुलकर्णी व विभावरी कुलकर्णी यांच्या घरी २२ दिवस सुरु होते. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून २९ हजार लोकांना जेवण देण्यात आले. केवळ जेवण नाही तर १४ हजार पाचशे लोकांना अन्न-धान्याचे किट वाटप करण्यात आले. यानंतर शांभवी साले यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. 

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडला शंभरी पार : आज दिवसभरात नऊ पॉझिटिव्ह, संख्या गेली १०६ वर

परिश्रम करणाऱ्या वॉरियर्सचा सत्कार
कार्यक्रमात कम्युनिटी किचनच्या माध्यमातून अविरत सेवा देण्यासाठी परिश्रम  करणारे कार्यवाह कुणाल गजभारे, विशाल शुक्ला, अमो मुनेश्वर, बाळू टोम्पे, शुभम चिंतावार, अभय गायकवाड, मीना बोेंढार, बालाजी नरवाड, शततारका पांडे यांच्यासह इतरांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी मंजिरी पुरंदरे, बाळू लोंढे व शततारका पांडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून मागील ५८ दिवसांपासून कोरोना वॉरियर्सना जेवण पुरविल्याबद्दल पोलीस कर्मचारी अर्चना भोकरे, होटकर यांच्या वतीने प्रविण साले यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अ‍ॅड. सुनिल कापुरे यांनीही सत्कार केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: What did MP Chikhlikar say at the end of 'Community Kitchen' ..., Nanded news