लसीकरण माहूर
लसीकरण माहूर

काय आहे कारण ? सोशल मीडियावरील अफवेमुळे आदिवासींचा लस घेण्यास नकार

माहूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या व नांदेड जिल्ह्यापासून जवळपास दोनशे किलोमीटर असलेल्या अतिदुर्गम बामनगुडा ( गोंड खेडी ) येथील नागरिकांनी सोशल मीडियात येणाऱ्या अफवा लस घेतल्यास माणूस नपुंसक होतो.

वाई बाजार (जिल्हा नांदेड) : माहूर (जिल्हा नांदेड) (Mahur bamanguda) तालुक्यातील शंभर टक्के आदिवासी गांव (Shedul tribe village) म्हणून परिचित असलेल्या बामनगुडा खेडी या गावात आदिवासी गोंड समाजाचे लोक राहतात. अंदाजे लोकसंख्या ४०० च्या आसपास असून समाज माध्यमावरील चुकीच्या अफवेमुळे चक्क या गावातील नागरिकानी कोविड लसीकरणावर बहिष्कार टाकून लसीकरणाला नक्कार दिल्याने आरोग्य पथकाला वारंवार परत जावे लागत होते. परंतु ( ता. सहा ) मे रोजी सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार (ias kirtikumar pujara) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी यांनी गावात जाऊन जनजागृती व मार्गदर्शन करुन लसीकरण करण्याचे (vaccination)आवाहन केले असता आरोग्य आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीने प्रेरित होऊन तब्बल १९ जणांनी कोविड लसीकरण करुन घेतले आहे.

माहूर तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या व नांदेड जिल्ह्यापासून जवळपास दोनशे किलोमीटर असलेल्या अतिदुर्गम बामनगुडा ( गोंड खेडी ) येथील नागरिकांनी सोशल मीडियात येणाऱ्या अफवा लस घेतल्यास माणूस नपुंसक होतो. व लस घेतल्यास वृद्धांचा अकाली मृत्यू होतो. इत्यादी या अफवा आदिवासी बहुल गावातील स्त्री- पुरुषाच्या डोक्यात एवढ्या भिन्नल्या होत्या की प्रशासनाचे यापुढे काही चालत नव्हते. लसीकरण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची टीम गावात आली की गावातील युवक सरळ शेतशिवारात पळून जायायचे, गावातील जूनी जानकार मंडळी मात्र पथकाला जगण्याची खात्री म्हणून कोऱ्या कागदावर लिहून दिल्यास आम्ही लस घेऊ असे छातीठोकपणे सांगत होते. तर काही लोकांना अस वाटत होतं की, लस घेऊन मरण्यापेक्षा नैसर्गिक मृत्यू आलेला बरा. काही लोकांची विचित्र मानसिकता होती ती म्हणजे प्रत्येक लसीकरण करुन घेणाऱ्या व्यक्तिला चार लाख रुपये द्या तर लस घेऊ असल्या बिनबुड़ाच्या अफवेमुळे आदिवासी बांधव आपला जीव धोक्यात घालत होते.

हेही वाचा -

वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवक, आशा वर्कर यांनी कितीही समजूत काढली तरी अख्ख गांव आपल्या उद्देश्यावर ठाम होता. या गावात सर्वप्रथम फक्त एकच लस टोचुन घेतली आहे. ती फक्त आशा वर्कर ताईने. ती पण लस घ्या म्हणुन गांवभर फिरत होती, अखेर तिलाही पळऊन लावण्यात आले. या व अशा स्वरुपांच्या घटनांची माहिती माध्यमाद्वारे समोर येत असल्याकारणाने आरोग्य विभागाने आपला मोर्चा सर्वप्रथम परवा वाई बाजार येथील कोलामखेड येथे जनजागृती करुन येथील कोलाम समाजातील बांधवांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रवृत्त केले.

गुरुवारी (ता. सहा) मे रोजी बामनगुडा (गोंड खेडी) तालुका माहूर येथे किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार, तहसीलदार राकेश गिड्डे, गटविकास अधिकारी पंचायत समिती माहूर युवराज म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे, प्राथमिक आरोग्य केंद्र शिनखेडच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सरोज आडे, आरोग्य सहायिका श्रीमती तायडे, आरोग्य सेविका श्रीमती भाले, आशा कार्यकर्ती चंद्रकला कोडापे, ग्रामसेवक, तलाठी व सरपंच विजय मंगाम, उपसरपंच विजय राठोड, पोलिस पाटील रघुनाथ खामकर, ग्राम पंचायत सदस्य भारत सिडाम, उल्हास राठोड ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण संदर्भात व्यापक मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आल्यानंतर प्रारंभी लसीकरण करण्यासाठी बहिष्कार टाकून नकार देणाऱ्या ग्रामस्थाने तालुका आरोग्य अधिकार्‍यांच्या जनजागृती कार्यक्रम नंतर स्वयंस्फूर्तीने लसीकरण करुन घ्यायला सुरुवात केली व एकूण १९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com