esakal | सावधान : झुम अॅप वापरता... तर मग ही घ्या काळजी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लाॅकडाउनमध्ये सायबर गुन्हे वाढतच असल्याने झुम अॅप वापरताना सायबर क्राईम घडु नये म्हणून दक्षता घेणे काळाची गरज असल्याचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ मक्सुद काझी यांनी सांगितले.

सावधान : झुम अॅप वापरता... तर मग ही घ्या काळजी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना आजार कोव्हीड- १९ विषाणुंचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लाॅकडाऊन वाढला आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या, शासकीय कामकाज, आॅनलाईन क्लासेस ह्या ‘वर्क फ्राॅम होम’ तत्वावर चालत असल्याने इंटरनेट व्हर्च्युल अॅप्लीकेशनचा वापर वाढला आहे. एकावेळी १०० व्यक्तींना आॅनलाईन व्हीडीओ काॅन्फरन्सिंग पुरविणाऱ्यासाठी झुम अॅपचा वापर जास्त प्रमाणात दिसुन येत आहे. लाॅकडाउनमध्ये सायबर गुन्हे वाढतच असल्याने झुम अॅप वापरताना सायबर क्राईम घडु नये म्हणून दक्षता घेणे काळाची गरज असल्याचे पोलिस उपनिरीक्षक आवेझ मक्सुद काझी यांनी सांगितले.

झुम अॅपचे स्वरुप व कार्यप्रणाली

झुम अॅप हे चीनमधील एरिक युवान ह्या व्यक्तीने क्लाऊड मिटींग्सकरिता तयार केलेले हे अॅप आहे. ज्यात एकाच वेळी १०० व्यक्ती व्हीडीओ चॅट ,मिटींग्स करु शकतात. लाॅकडाउन काळात हे सर्व सोईस्कर असल्याने झुम अॅपचा वापर मागील तिन महीन्यात २० पटीने वाढलाय. त्याचबरोबर सायबर सेक्युरिटीच्या दृष्टीकोनातुन झुम अॅपचा धोका पण लक्षात येणे गरजेचे आहे.

हेही वाचा - गुड न्यूज : ‘ते’ ३१ रुग्ण आज जाणार घरी

झुम अॅपचे संभाव्य धोके

झुम अॅपचा वापर वेबकॅम आधारीत असल्याने युझर्सच्या मिटींग्समधील संवेदनशील डाटा हॅकर चोरी करुन मालवेअर, रॅन्समवेअर किंवा पाॅर्न खंडणी इत्यादी प्रकारचे गुन्हे करु शकतात. झुम अॅपमध्ये एन्ड टु एन्ड (End to End Encryption) नसल्यामुळे व्हीडीओ मिटींग्समधील गोपनीय माहिती लिक करुन सायबर स्पेसमध्ये सोडु शकतात. cert-in.org.in. इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) च्या सुचना Cert-in हे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामधील एक कार्यालय आहे. हॅकिंग आणि फिशिंग यासारख्या सायबर घटनांचा सामना करण्यासाठी ही एक नोडल एजन्सी आहे. हे भारतीय इंटरनेट डोमेनची सुरक्षा- संबंधित संरक्षण मजबूत करते.

तसेच केंद्रीय गृहमंत्रालयाने सुद्धा झुम अॅप बद्दल अॅडव्हायझरी प्रकाशित केली असुन झुम अॅप वापरताना खालील सुचना पाळण्यासंर्दभात सांगितले गेले आहे.

ँ आॅनलाईन मिटींग्सचे पासवर्ड हे मजबुत (Alphanumerical) असावे.
ँ प्रत्येक मिटींग्सच्या वेळी अॅप अपडेट करावे.
ँ प्रत्येक मिटींग्सच्या वेळी युनिक/स्वतंत्र पासवर्ड देण्यात यावा.
ँ प्रत्येक युझरला मिटींग्समध्ये डायरेक्ट अॅक्सेस न देता वेटींग रुमचा आॅप्शन एनेबल ठेवावा.
ँ अनोळखी व्यक्तींना प्रवेश नाकारण्यात यावा.
ँ महत्त्वाची माहिती, फाईल्स शेअर करु नका.
ँ खासगी संभाषण, वैयक्तीक संभाषण क्लाॅड मिटींग्समध्ये करु नका.
ँ आपण क्लाऊड मिटींग्स घेणार आहोत व त्यात कोणता विषय असेल याबाबतची माहिती असंबंधित व्यक्तींना देऊ नका.
ँ झुम अॅपवर अनाहुतपणे अश्लिल संदेश, क्लिप्स किंवा साहित्य आल्यास तात्काळ त्यातुन बाहेर पडा.
ँ झुम अॅपची गरज असेल तर हा अॅप मोबाईलमध्ये /लॅपटाॅपमध्ये ठेवा. स्पायवेअरद्वारे ही माहीती हॅकर चोरुन गुन्हे करु शकतात. तसेच झुमअॅप संर्दभातील काही गुन्ह्यांची माहिती असल्यास सायबर पोलिस ठाण्याशी संपर्क करा.

येथे क्लिक करामुलीला पाठविले बाहेर, केला तिच्या मैत्रीणीवर अत्याचार

जर्मन मंत्रालयाने झुम अॅपवर बंदी घातली

जागतीक परामर्श झुमअॅपचा डाटा फेसबुक सोबत शेअर लिंक्ड झाल्याने डाटा इनसेक्युरिटीमुळे झुमअॅप बाबत जागरुकता आवश्यक आहे. अमेरीकन वेबसाईट c- net नुसार कॅलीफाॅर्निया देशाने झुमअॅप बाबत लाॅ सुट फाईल केली आहे. तसेच वाॅशिंग्टन पोस्टअन्वये झुम अॅपमधील हजारो व्हिडीओस लिक होऊन सायबर स्पेसमध्ये उपलब्ध होत आहेत. त्याचा दुरुपयोग होऊ शकतो. जर्मन मंत्रालयाने झुम अॅपवर बंदी घातली आहे. त्याच धर्तीवर केंद्रिय गृहमंत्रालय अॅडव्हाझरी व CERT- IN च्या सुचना पाळणे अत्यावश्यक आहे. सायबर सुरक्षा ही सामाजीक जबाबदारी असल्याने सर्वांनी सायबर गुन्हेगारी कमी होण्याच्या दृष्टीकोनातुन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- आवेझ मक्सुद काझी, पोलीस उपनिरीक्षक, लातुर, नांदेड परिक्षेत्र.