esakal | ‘मी आणि तुम्ही आहात’ असे कोण कोणास म्हंटले...? वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या दुसऱ्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी यांनी यावेळी अवैध वाळू साठा, बोटी, क्रेन आणि टीप्पर असा लाखोंचा ऐवज जप्त केला.

‘मी आणि तुम्ही आहात’ असे कोण कोणास म्हंटले...? वाचा सविस्तर

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : वाळू माफियांना जिल्ह्याधिकाऱ्यांनी मुदखेड तालुक्यात दुसऱ्यांदा दणका दिला आहे. या दुसऱ्या धडाकेबाज कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. जिल्हाधिकारी यांनी यावेळी अवैध वाळू साठा, बोटी, क्रेन आणि टीप्पर असा लाखोंचा ऐवज जप्त केला. ही कारवाई रविवारी (ता. दोन) सायंकाळी मुदखेड तालुक्यातील वासरी, शंखतिर्थ परिसरात केली. 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे रविवारी (ता. दोन) सायंकाळी उमरी तालुक्याकीतील कोवीड सेंटर व अन्य माहिती घेण्यासाठी सकाळी दौऱ्यावर होते. ते सायंकाळी आपला दौरा आटोपून परत नांदेडकडे निघाले. यावेळी त्यांना आमदूरा परिसरातून पुढे आपले वाहन वासरी आणि शंखतिर्थ वाळू घाट गाठले. यावेळी तेथे बिनबोभाटपणे अवैध वाळू उपसा सुरु होता. डॉ. विपीन यांनी त्या ठिकाणच्या सात बोटी, एक क्रेन व काही टीप्पर व वाळूचा साठा जप्त केला. 

हेही वाचा -  अट्टल गुन्हेगार विक्की चव्हाण गोळीबारात ठार

जिल्हाधिकाऱ्यांचा पंधरा दिवसात दुसरा दणका 

वाळू ठेकेदारांना जिल्हाधिकाऱ्यांचा पंधरा दिवसात दुसरा दणका आहे. सध्या जिल्ह्यात कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात प्रशासन यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. एकीकडे शहरात लॉकडाउन असल्याने नागरिक रस्त्यावर नाहीत मात्र दुसरीकडे जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ सुरुच आहे. हा धुमाकूळ फार पूर्वीपासून चालू आहे. त्याप्रमाणेच वाळूच्या तस्करीवर अद्याप रामबाण उपाय सापडलेला नाही. पण जिल्हाधिकारी यांनी वाळू चोरीच्या धंद्यावर आपले लक्ष केंद्रित केले असून मुदखेड, नांदेड तालुक्यातील नदी काठावरील बोटी आणि वाळूचा अवैध साठा पकडला आहे. पकडलेल्या बोटी, क्रेन आणि साहित्य तातडीने जप्त करून तहसीलमध्ये जमा करा अन्यथा तुम्ही आणि मी आहोत अशी तंबी दोन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

वाळू माफियांना कुठलीच बंधने नाहीत का ? 

कोरोनाच्या संक्रमणामुळे एकीकडे बाजारपेठा ठप्प आहेत. वेगवेगळ्या निर्बंधाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. वाळू माफियांना कुठलीच बंधने नाहीत या थाटात नदी घाटावरून वाळूचा उपसा केला जात आहे. त्यासाठी बोटी आणि क्रेनसारखी अवजारे वापरली जात आहेत. बऱ्याच वेळी वाळू माफियांच्या बोटी स्फोटकाद्वारे निकामी करण्यात आल्या. तरीही वाळू उपसा काही केल्या थांबण्याचे नाव घेत नही. जिल्ह्यातील एकाही वाळू घाटांचा लिलाव होऊ शकलेला नाही. विविध नियमांची पूर्तता करण्यातच बराच कालावधी निघून गेला या संधीचा फायदा उचलत अनेकांनी वाट्टेल त्या घाटावरून वाळूचा अवैध उपसा करून चढ्या भावाने विक्री करून अमाप पैसाही कमावला आहे. 

येथे क्लिक करारुग्णांमध्ये आत्मविश्वास व सकारात्मक भाव महत्वाचा- अधिष्ठाता डॉ. सुधिर देशमुख

तहसीलदारांना तंबी 

या कारवाईनंतर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी तहसीलदार नांदेड आणि मुदखेड तसेच पोलिस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. पकडलेली एकही बोट किंवा क्रेन घटनास्थळावरून गायब झाल्यास खपून घेणार नाही. तसे झाल्यास ‘मी आणि तुम्ही आहात’ अशी तंबी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला देऊन पकडलेले साहित्य तातडीने जप्त करा व तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. 

loading image
go to top