नांदेड : दुधातील घातक पदार्थाची भेसळ रोखणार कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुधात भेसळ

नांदेड : दुधातील घातक पदार्थाची भेसळ रोखणार कोण?

नांदेड - राज्यभरात उन्हाचा पार वाढला आहे. उष्माघाताने अनेक जणांना प्राण गमवावे लागत आहेत. त्याच उन्हाच्या तडाख्यात प्राण्यांचा जिव देखील व्याकुळ होताना दिसतोय. प्रचंड वाढलेल्या तापमानामुळे दूभते जनावरांची चाऱ्यावरील वासना कमी झाली. त्याचा थेट परिणामी दुधावर झाला असून, दुधाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे नेहमीचा दुधाचा वरवा असलेल्या ग्राहकांना दुध पुरत नसल्याने दुधात पाण्यासोबतच इतरही घातक पदार्थ मिसळून भेसळयुक्त दुध विक्री केली जात आहे. त्याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील काही दिवसापूर्वी पशुखाद्य व चारा उत्पादक शेतकऱ्यांचा खर्च वाढल्याने दुध उत्पादक संघाने एक लिटर (पॉकेट बंद) दुधाच्या किमतीमध्ये दोन रुपयापर्यंत वाढ केली आहे.

दुसरीकडे स्थानिक पातळीवरील पशुपालकांनी देखील कडब्याचे दर व पशु खाद्याचे दर वाढल्याचे कारण पुढे करत काही दिवसांपूर्वीच खुल्या दुधाची किंमती ६० रुपये लिटर वरुन ते ७० रुपयापर्यंत वाढल्या होत्या. तरी देखील खात्रीलायक दुध मिळत असल्याने ग्राहकांनी दुधाच्या वाढलेल्या किंमतीकडे दुर्लक्ष करत महिण्याला ३०० रुपये जास्त देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र एक महिणा होत नाही तोच काही दुध उत्पादक शेतकऱ्यांनी (ता.एक) मे पासून पुन्हा लिटर मागे दहा रुपयाची वाढ केल्याने ग्राहकांमध्ये तिव्र नाराजी पसरली आहे. तर दुसरीकडे घरपोच दुध देणाऱ्या अनेक शेतकऱ्यांकडे दुधाळ जनावरे नसताना देखील केवळ पैसा मिळतोय म्हणून त्यांच्याकडे दुधात जास्तीचे पाणी घालुन दुध विक्री केली जात आहे. घरपोच दुध देणाऱ्या दुधवाल्यांकडे मिळणाऱ्या दुधांच्या किंमती या ५०, ६० आणि ७० रुपये लिटर असा दर असतो. दुधात जितकी भेसळ तितका दुधाचा रेट कमी असे सरळ गणित असून, केवळ पैसे कमवण्याच्या नादात दुध वाल्यांकडून ग्राहकांना पाण्याच्या भेसळी सोबतच इतरही विषारी औषधांची भेसळ युक्त दुधांची विक्री केली जात आहे. असे असताना देखील अन्न व औषध प्रशासन विभाग मात्र हाताची घडी अन् तोंडावर बोट अशी भूमिकेतून घडत असलेल्या सर्व प्रकाराकडे बघत असल्याने सामान्य नागरीकांमध्ये असंतोषाची लाट पसरत आहे.

Web Title: Who Will Stop Dangerous Substance Adulteration In Milk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top