esakal | पतीच्या अंत्यदर्शनाला मुकली पत्नी, कुठे व का ते वाचा...?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

पतीच्या निधनानंतर त्याच्यावर नांदेड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना बाधित असलेल्या पत्नीला आपल्या पतीचे अंत्यदर्शन घेता आले नसल्याचा दुर्दैवी प्रसंग बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील महिलेवर.

पतीच्या अंत्यदर्शनाला मुकली पत्नी, कुठे व का ते वाचा...?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना पॉझिटिव निघालेल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर शेवटचे दर्शन पत्नीला घेता आले नाही. याबाबत दुर्दैव असे की, पत्नीसुद्धा कोरोना बाधीत झाल्याने बिलोली कोवीड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. पतीच्या निधनानंतर त्याच्यावर नांदेड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना बाधित असलेल्या पत्नीला आपल्या पतीचे अंत्यदर्शन घेता आले नसल्याचा दुर्दैवी प्रसंग बिलोली तालुक्यातील चिंचाळा येथील एका वृद्ध महिलेवर ओढवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

मागील आठ दिवसापासून सर्दी तापाने ग्रासलेल्या ७० वर्षीय व्यक्तीचा ता. २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कोरोनामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. नेमके त्याच दिवशी मयताच्या पत्नीचा कोरोना पॉझिटिव अहवाल आल्याने तिच्यावर बिलोलीच्या कोवीड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. तब्बल चाळीस वर्षे एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन संसाराचा गाडा हाकणाऱ्या पतीचे निधन झाल्याचे समजताच कोरोना बाधित महिला धाय मोकलून रडू लागली. परत कोरोनामुळे पतीच्या पार्थीवावर शासकिय यंत्रणेने त्यांच्या मुलांच्या उपस्थितीत नांदेड येथे अंत्यसंस्कार केले.

मयत व्यापाऱ्याची ६० वर्षीय पत्नी कोरोना बाधीत 

ता. तिन ऑगस्ट रोजी सर्दी ताप आलेल्या चिंचाळा येथील ७० वर्षीय एका व्यापाऱ्याने आजाराचे निदान करण्यासाठी बिलोली शहरातील तिन खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु प्रकृती बिघडत असल्याने त्यांनी ता. २२ ऑगस्ट रोजी नांदेडचे खाजगी रुग्णालय गाठले. ते कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची कोरोना तपासणी देखील केली. यामध्ये सदर व्यापाऱ्याची ६० वर्षीय पत्नी कोरोना बाधीत निघाली. त्यांच्यावर बिलोली येथे उपचार करण्यात येत आहे. 

loading image
go to top