‘या’ महिला करतात एकमेकिंवर जीवापाड प्रेम

Nanded News
Nanded News

नांदेड : कुटुंब, कार्यालये, समाजात एकता नसल्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्‍भवत आहे. प्रत्येकजण मला काय त्याचे असे म्हणून स्वार्थ साधत आहे. एकता काय असते याचाच विसर आज प्रत्येकाला पडला आहे.

हनुमानटेकडीच्या मागील बाजूस सुंदरनगर वसाहत आहे. पोलिस वसाहतीतूनही या ठिकाणी जाता येते. या नगरामध्ये साईबाबा गृहनिर्माण सोसायटी उभी राहिलेली आहे. यातील काही महिलांना भजन-गायनाची आवड असून साईबाबांवर मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे महिलांमध्ये किंबहुना समाजामध्ये एकता निर्माण व्हावी, या उद्देशाने महिलांनी विशेषतः कमलबाई राठोड यांच्या पुढाकारातून साईबाबा महिला भजन मंडळाची १९८६ मध्ये स्थापना झाली आहे.

सुरुवातीला चारच महिला भजनगायन करत असत. १९८७ मध्ये सोसायटीने मंदिरासाठी १०० बाय १०० ची जागा दिली. सुरुवातीला साईबाबाची छोटी मूर्ती बसविण्यात आली होती. तेव्हापासून मंदिरात प्रत्येक गुरुवारी भजनाचा जागर होतो. कालांतराने शिर्डी येथे साईबाबा संस्थानमध्ये भजनगायन करण्याची संधी या महिलांना मिळाली. 

दमदार सादरीकरणामुळे संस्थानतर्फे साईबाबा मंदिरासाठी देणगी दिली. त्या देणगीतून २००९ मध्ये साईबाबाची संगमरवरी मूर्ती बसविण्यात आली. नवरात्रोत्सवामध्ये नऊही दिवस देवीची, साईबाबांची पदे सादर करून समाज परिवर्तनाचेही काम या महिला करीत आहेत. शिवाय रामनवमी, गुरुपौर्णिमा, गणेशोत्सव, गोकुळाष्टमी, दत्तजयंती, तुकाराम महाराज बीज आदी उत्सवही मंडळातर्फे साजरे होत आहेत.

सामाजिक बांधिलकीही
गेल्या १७ ते १८ वर्षांपासून भागवत सप्ताह (ज्ञानयज्ञ) महिला मंडळातर्फे होतो. सर्व नियोजन हे महिलाच करतात, हे या सप्ताहाचे विशेष आहे. गुरु यज्ञ सोहळ्यामध्ये २०१२ मध्ये मंडळाने एका गरीब कुटुंबातील जोडप्यांचा विवाह लावून समाजाला दिशा दाखविण्याचे कार्य केले. सात दिवस भागवत स्वहाकार गुरुयज्ञ सोहळा होतो. तसेच दिवाळीमध्ये गोवर्धन आणि अन्नकुट पूजा करण्याचीही मंडळाची परंपरा आहे.

आमच्या भजन मंडळामध्ये सर्व महिला सदस्या कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नियमित सहभागी होतात. विशेष म्हणजे आम्ही सर्वजणी कुटुंबापेक्षाही एकमेकींवर जीवापाड प्रेम करून मदत करतो. सुख-दुःखामध्येही धाऊन जातो.
- कमलबाई राठोड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com