Addiction-Free Society : व्यसनमुक्त समाजनिर्मितीसाठी लढणारी शिक्षिका...

अध्यापनासोबतच जनजागृतीचे कार्य; ‘व्यसनमुक्तीच्या वाटेवर’ पुस्तकही प्रकाशित
Addiction-Free Society
Addiction-Free Societysakal

नांदेड : अलीकडे मानवी जीवनात आरोग्यदायी जीवनाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. सुखी व समृद्ध जगण्यासाठी मनुष्य सतत धडपडत असतो. आर्थिकदृष्ट्या सक्षमता आली तरी तो सुखी समाधानाने आयुष्य जगेलच असे नाही. आरोग्यदायी जीवनामुळेच आयुष्याचे सार्थक झाल्याची अनुभूती मिळते.

आजच्या पिढीला व्यसनाधीनतेची कीड लागल्याने ती मोडीत काढणे ही काळाची गरज आहे. सामाजिक जाणीवेतून आपले अध्यापनाचे कार्य करत व्यसनमुक्ती कार्यास वाहून घेण्याचे कार्य लोहा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असलेल्या राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका छाया बैस - चंदेल या धडपड करत आहेत.

अध्यापनाचे कार्य करणारा शिक्षक समाजासाठी एक आदर्श असतो. सक्षम भावी पिढी निर्माण करण्याचे कार्य शिक्षक करत असतात. परंतु आपल्या कर्तव्याच्या चौकटीत बंदिस्त न रहाता ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने प्रेरित होऊन छाया बैस यांनी व्यसनमुक्तीचे कार्य हाती घेतले आहे.

Addiction-Free Society
Nanded : नांदेड महापालिकेची कर वसुलीसाठी धडक कारवाई; दुकाने, कार्यालये सील; नळ, मलनिःसारण जोडणी खंडित

माजी राज्यपाल भगतसिंह कोशीयारी यांचे हस्ते नुकतेच ‘व्यसनमुक्तीच्या वाटेवर’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थी, युवक तसेच एकंदर समाजात व्यसनाधीनता बद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. व्यसनमुक्त होऊन निरामय जीवन जगू इच्छिणाऱ्या लोकांना तसेच व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात कार्य करणा-या कार्यकर्त्यांना हे पुस्तक निश्चित मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

व्यसनाधीनतेमुळे शरीरावर गंभीर परिणाम

जनजागृती हे व्यसनमुक्तीसाठी प्रभावी माध्यम मानले जाते. व्यसनाधीनतेमुळे मानवी शरीरावर होणारे गंभीर परिणाम, कुटुंबातील सदस्यांची होत असलेली हेळसांड, अठरा विश्व आलेले दारिद्र्य, मानसिक संतुलन बिघडणे असे अनेक विपरीत परिणामांची जाणीव झाल्यास व्यसनाधीनतेला पायबंद घालता येऊ शकतो. आणि हीच बाब हेरून बालवयात योग्य संस्कार घडवले जातात यासाठी शालेय विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांचे माध्यमातून जागृत करण्याचे कार्य अविरतपणे सुरू आहे.

Addiction-Free Society
Nanded : नांदेडचे राजकीय वातावरण तापले...

व्यसनामुळे मानवी शरीरावर होणारे विपरीत परिणाम यांचे गांभीर्य विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी विविध माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे. ज्यामध्ये पोस्टर संदेश, भिंती चित्रे, वाद विवाद स्पर्धा, परिसंवाद, पथनाट्य अशा अनेक प्रकारे विद्यार्थ्यांना समजेल अशा साध्या व सोप्या भाषेत व त्यांच्या मनावर खोलवर रुजवले जाईल, या पद्धतीने विविध उपक्रमाचे आयोजन करत आहे.

- छाया बैस - चंदेल, जिल्हा परिषद शिक्षिका, लोहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com