esakal | जागतिक महिला दिन : कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ; कर्तुत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान!
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आरोग्य विभागातील कर्तृत्वान महिला, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आले.

जागतिक महिला दिन : कोविड लसीकरण केंद्राचा शुभारंभ; कर्तुत्ववान महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान!

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड ) : राज्यासह देशभरात राबविण्यात येणारा कोविड-१९ लसीकरणाचा उपक्रम हा माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे सुद्धा राबविण्यात येत असून त्याची सुरुवात सोमवारी (ता. आठ) मार्च रोजी जागतिक महिला दिनी करण्यात आला. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते आरोग्य विभागातील कर्तृत्वान महिला, वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आले.

वाई बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सहा उपकेंद्रांमध्ये समाविष्ट गावातील नागरिकांना कोरोना लसीकरण केंद्रातून केले जाणार आहे. शिवाय महिलांनी स्वतः च्या हक्कासाठी जगाच्या उद्धारासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. प्रारंभी ता. २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरी ही सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार आठ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

हेही वाचा - Womens day 2021: गावपातळीवरील ‘मनस्विनी’ सुचिता खल्लाळ

अशा या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्याची आरोग्य विभागाची कल्पना चांगली ठरली. शुभारंभाच्या निमीत्ताने आरोग्य क्षेत्रात अहोरात्र रुग्णसेवा देणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करून आरोग्य विभागाने आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव यांचे हस्ते फित कापून लसीकरण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. तद्नंतर पोलिस पाटील आशाताई मोरे, रुपला नाईक तांडा येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्विटी भोयर, आरोग्य सेविका निमाताई जयस्वाल, एस. एम. शेख, परिचारीका निर्जला बेद्रे, आशा वर्कर कविता खराटे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला. 

यावेळी बोलताना समाधान जाधव यांनी सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. तसेच लसीबाबत फारच खोट्या वावड्या उठत आहे. तेव्हा कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, शंका असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधा असे ते म्हणाले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. भिसे यांनी कोरोनाची लस घेणे किती जरुरीचे आहे. हे उपस्थितांना पटवून दिले. तर घरोघरी जावून नागरिकांना लसीकरणाबाबत जागरुक करण्याची गरज असल्याचे बोलून दाखविले. यासह माहूर पंचायत समितीचे उपसभापती उमेश जाधव यांनी लसीकरणाच्या यशस्वितेसाठी सर्वतोपरी परिश्रम घेत असल्याचे सांगितले.डॉ. श्रिनिवास हुलसुरे व डॉ. स्वप्नील राठोड यांनी लसीकरण केंद्राच्या शुभारंभासाठी परिश्रम घेतले. औषध निर्माण अधिकारी संदेश बेहेरे व आरोग्य सहाय्यक डी. के. जोशी यांनी लसीकरण केंद्राच्या शुभारंभात मोलाची भुमिका बजावली. आरोग्य सेवक एस. बी. आराख यांनी सुत्र संचालन केले. या कार्यक्रमाला नवीद खान, कैलास बेहेरे व बळीराम मोरे यांची उपस्थिती होती. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image