का? व्हावे समन्यायी रोजगाराचे वितरण; सांगतायत यमाजी मालकर

File Photo
File Photo

नांदेड ः ‘कोरोना’नंतर निर्माण झालेल्या बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी यंत्रास विरोध करून चालणार नाही. यापुढे कामगारांना उपलब्ध रोजगाराचे समन्यायी वाटप करणे गरजेचे आहे. असे मत पुणे येथील ज्येष्ठ संपादक यमाजी मालकर यांनी येथील पीपल्स महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाद्वारे आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय ‘वेबिनार’ चर्चासत्रात केले.


पीपल्स महाविद्यालय येथे पदव्युत्तर वाणिज्य व व्यवस्थापन व संशोधन केंद्राच्यावतीने आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय ‘वेबिनार’ चर्चासत्र संपन्न झाले. ‘कोरोना’नंतरची आर्थिक क्षेत्रासमोरील आव्हाने व उपाय’ या विषयावर सोमवारी (ता.२५) मेला संपादक यमाजी मालकर व ज्येष्ठ अर्थतज्ञ मा. एच. एम. देसरडा यांनी आपले विचार मांडले.

कोरोनामुळे आर्थिक संकटही उभे

या वेळी प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांनी प्रास्ताविक केले. या वेळी नांदेड एजुकेशन सोसाटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे, संस्थेच्या सचिव प्रा. श्यामल पत्की यांची उपस्थिती होती. विज्ञान व तंत्रज्ञानाने प्रगती करूनही कोरोनावर अद्याप कोणतीही लस शोधण्यात यश आले नाही. त्यामुळे निसर्गाशी अनुकूल जगणे आवश्यक आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटही उभे आहे. कोरोना या रोगाने थैमान घातल्याने सामान्य जनतेची परवड झाली आहे. या परिस्थितीत सर्व भारतीयांनी आपल्या सहनशीलता व क्षमता सिद्ध केल्या आहेत. पुढे बोलताना यमाजी मालकर म्हणाले ‘कोरोना’नंतर आपल्या क्षमता वाढविण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण, उद्योग व व्यवसायाचे विकेंद्रीकरण व सरकारचे उत्पन्न वाढविणे व जनतेची क्रयशक्ती वाढविण्याचे कार्य करणे आवश्यक आहे. तरच अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल व रोजगारात वाढ होईल.

देसरडा म्हणतात सामाजिक सुरक्षा हवी 

कोरोनानंतरच्या परिस्थितीस भौतिक विकास जबाबदार असून, पॅकेजऐवजी जनतेच्या मूलभूत गरजांची हमी घेऊन सामाजिक सुरक्षा द्या, असे मत डॉ. एच. एम. देसरडा यांनी व्यक्त केले. उत्पन्न कराबरोबरच संपत्तीकर व वारसाकर आकारण्यात यावा. सरकारचे उत्पन्न वाढल्याशिवाय लोककल्याण कार्य करणे अशक्य आहे.

चार राज्याचे प्राध्यापक विद्यार्थ्यांनी लावली हजेरी

‘वेबिनार’साठी राज्यस्थान, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तरप्रदेश येथील प्राध्यापक व महाराष्ट्रातील ८०० हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थीं उपस्थित होते. चर्चासत्राचे सूत्रसंचालन समन्वयक व उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. बी.डी. कोंपलवार यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. सचिन पवार यांनी मानले. ‘वेबीनार’ यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ. सी.के. हरनावळे, डॉ. दत्ता यादव, डॉ. मोहन रोडे, डॉ. आर. डी. डोईफोडे, प्रा. विजू जाधव, राहुल देशमुख, डॉ. विशाल पतंगे, डॉ. पंढरी गड्डपवार, श्री. राहुल गवारे इत्यादिंनी परिश्रम घेतले.    

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com