esakal | कोरोनामुळे आम्ही भाऊ गमावला; नागरिकांनो दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी काळजी घ्या, सोशल मीडियावर कळकळीचे आवाहन.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोत्तावार  परिवाराचे  सोशल मीडियावर कळकळीचे आवाहन......

कोरोनामुळे आम्ही भाऊ गमावला; नागरिकांनो दुसऱ्यासाठी नाही तर स्वतःसाठी काळजी घ्या, सोशल मीडियावर कळकळीचे आवाहन.

sakal_logo
By
प्रभाकर लखपत्रेवार

नायगाव ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाने घरातील व्यक्तीचे निधन झाल्यास ही बाब प्रत्येकजन लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो पण लोहगाव येथील कोत्तावार परिवाराने मात्र कोरोनामुळे आम्ही आमचा भाऊ गमावला आहे. त्यामुळे मित्रांनो स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या. कोरोनापासून दूर रहा असे कळकळीचे आवाहन सोशल मीडियावर केले आहे. त्यांचे हे कळकळीचे आवाहन सर्वांना विचार करायला भाग पाडणारे आहे. 

एकीकडे शासन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत असताना तालुका प्रशासन मात्र अजूनही गांभीर्याने का घेत नाही असा सवाल उपस्थित होत आहे. नायगाव शहराबरोबरच नरसी बाजारपेठेतही नागरिकांची मोठी वर्दळ असून कोणाच्याही तोंडाला मास नाही. सोशल डिस्टंसिंग तर अजिबात नाही. कोरोना टाळायचे असेल तर प्रत्येक नागरिक करणे विचार करणे व शासनाने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पण सध्या तरी ग्रामीण भागात अजूनही गांभीर्याने कोणी लक्ष देत नाहीत. 

लोहगाव येथील कोत्तावार परिवारांतील नांदेड मधील एका बंधूचे काल नांदेडमध्ये कोरोना आजाराने निधन झाले. कोत्तावार परीवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. कोरोना किती भयानक बिमारी आहे याचा अनुभव आला. बेफिकिरी किंवा निष्काळजीपणा अजिबात नको आपल्या कुटुंबातील एक सदस्य कोरोनामुळे गमावल्यावर कोत्तावार परिवाराने काल सोशल मीडियावर एक भावनिक पोष्ट टाकून सर्वांना नागरीकांना कळकळीचे आवाहन केले आहे. 
    
कुणीही निष्काळजीपणाने वागू नये अनुभवाचे बोल त्यांनी सोशल मिडियातून व्यक्त केले आहेत. कोरोनामुळे आम्ही आमचा भाऊ गमावला आहे. नुसता भाऊच नव्हे तर एक मार्गदर्शक सल्लागार वडीलासारखा एक मजबूत पाठीराखा संकटकाळी प्रत्येक वेळी धावून येणारा उत्तम मार्गदर्शक, आमची  सावली या कोरोणामुळे आम्हाला गमवावी लागली आहे. नागरीकांनो तुम्ही वेळीच सावध व्हा. मास्क वापरा दुसऱ्यासाठी नाही तरी कमीत कमी स्वतःसाठी व तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी असे आवाहन केले आहे.  

कोरोनामुळे घरातील कर्ता पुरुष गेल्यावर त्या कुटूंबाची काय अवस्था होते हे कोत्तावार परिवाराने अनुभवलेले असतांना दुख: बाजूला ठेवून त्यांनी कळकळीचे आवाहन करणारे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. हे विचार करायला भाग पाडणारे आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image