नांदेडमध्ये पुन्हा पिस्तूलधारी युवकास अटक; कुठे आहे कायदा व सुव्यवस्था ?

file photo
file photo

नांदेड : नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काळेश्वर मंदिर विष्णुपुरी परिसरात एका संशयीत फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस आणि एक दुचाकी जप्त केली. ही कारवाई इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने गुरुवारी (ता. २५) सायंकाळी पाचच्या सुमारास केली. 

अटक केलेल्या युवकाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की इतवारा पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकप्रमुख पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांना पोलिस उपाधीक्षक (इतवारा) सिद्धेश्वर भोरे, पोलिस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी सुचना दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेवरुन विष्णूपुरी परिसरात काळेश्वर मंदीराजवळ एक पिस्तुलधारी युवक दहशत पसरवित असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीवरुन श्री. काळे यांनी आपल्या पथकासह विष्णूपुरी काळेश्वर मंदिर परिसर गाठले.

ता. 25 फेब्रुवारीच्या सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास काळेश्वर मंदिर परिसरात नितेश केशव डोंगरे (वय २७) राहणार धनेगाव, तालुका, जिल्हा नांदेड हा संशयास्पदरित्या मंदिर परिसरात फिरत होता. फौजदार श्री. काळे यांनी नितेश डोंगरे याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसस आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील हे घातक शस्त्र व एक दुचाकी असा एकूण 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फौजदार दत्तात्रय काळे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात नितेश डोंगरेविरुद्ध भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सांगळे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com