esakal | नांदेडकरांसाठी दिलासा! कोरोना मृत्यूचे प्रमाण शून्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

covid

नांदेडकरांसाठी दिलासा! कोरोना मृत्यूचे प्रमाण शून्यावर

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात Nanded उपचार घेत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह Corona Positive रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण शून्यावर आले आहे. दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील कोरोना Corona पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एकही गंभीर नाही. बुधवारी (ता.१४) प्राप्त झालेल्या एक हजार ३९१ अहवालापैकी एक हजार ३५७ निगेटीव्ह तर आठ व्यक्तींचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. आजच्या घडीला ५५ रुग्ण उपचार घेत असून बुधवारी दिवसभरात जिल्ह्यातील सात कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या रुग्णांपैकी बुधवारी एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही. zero corona death in nanded, many patients cured glp88

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबादेत मुसळधार पाऊस, रस्त्यांवर पाणीच पाणी

त्यामुळे जिल्ह्यात आजवर एकूण मृत्यूची संख्या एक हजार ९०६ वर स्थिर आहे. एकूण बाधितांची संख्या ९१ हजार ३४७ एवढी झाली असून यातील ८८ हजार ७८८ रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. बुधवारी बाधितांमध्ये नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - तीन, मुखेड- दोन, कंधार - दोन आणि हिंगोली जिल्ह्याकील एक असे आठ बाधित आढळले.

नांदेड कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह - ९१ हजार ३४७

एकूण बरे - ८८ हजार ७८८

एकूण मृत्यू - एक हजार ९०६

बुधवारी पॉझिटिव्ह - आठ

बुधवारी बरे - सात

बुधवारी मृत्यू - शुन्य

उपचार सुरु - ५५

loading image