#Motivational : 'ते' अपघातग्रस्त खेळाडू...पण इच्छाशक्तीच्या जोरावर पोहचले अंतिम सामन्यात..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

अपघाताने खचून न जाता आपले दोन सहकारी जायबंदी असताना ते मनात त्यांनी ठेवले. पण आपले दुःख कुरवाळत न बसता हे वीर मैदानात उतरले. ते शूरवीर तानाजी मालुसरे यांचा नववारसा घेऊनच. "आधी लगीन खेळाचे' हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून हा वारसा या मराठी मातीचा आहे, याची नव्याने ओळख करून दिली. या मुलांचे कौतुक करायला शब्द नाहीत. खेळात हार-जित असतेच, पण आमची ही मुले प्रत्यक्षात मृत्यूला जिंकून आली.

नाशिक : अकोल्याच्या बोरगाव मंजूच्या पुढे वाशिंब्याजवळ नाशिकच्या खो-खोपटूंच्या गाडीला बुधवारी (ता. 27) सायंकाळी अपघात झाला. यात साक्षात मृत्यू पाहून आलेले हे सर्व खेळाडू होते. अपघातामुळे शारीरिक व मानसिक अशा दोन्ही आघाड्यांवर ते खचलेले दिसत होते. मात्र, त्याच मुलांनी गुरुवारी (ता. 28) चमत्कार केला. सकाळी यजमान अमरावती संघाचा, तर उपांत्य फेरीत मुंबई संघाचा पराभव करून अंतिम फेरीत रुबाबात प्रवेश केला. हे सगळे स्वप्नवत आहे. 

हेही वाचा > रात्रीच्या वेळेस 'कोणीतरी' अज्ञात फिरतयं शिवारात....गावकऱ्यांमध्ये घबराट

 "आधी लगीन खेळाचे'
अपघाताने खचून न जाता आपले दोन सहकारी जायबंदी असताना ते मनात त्यांनी ठेवले. पण आपले दुःख कुरवाळत न बसता हे वीर मैदानात उतरले. ते शूरवीर तानाजी मालुसरे यांचा नववारसा घेऊनच. "आधी लगीन खेळाचे' हे त्यांनी कृतीतून सिद्ध करून हा वारसा या मराठी मातीचा आहे, याची नव्याने ओळख करून दिली. या मुलांचे कौतुक करायला शब्द नाहीत. खेळात हार-जित असतेच, पण आमची ही मुले प्रत्यक्षात मृत्यूला जिंकून आली. त्यामुळे उद्याचा निकाल काही लागो; आमची मुले आयुष्याची या वयातील स्पर्धा विजेते आहेत, हे मात्र नक्की! इतिहास घडविण्यासाठी त्यांना तुमच्या सदिच्छांमुळे खूप बळ मिळाले. माणुसकीचा हा झरा असाच अखंड वाहत राहो, अशी भावना नाशिक जिल्हा खो- खो असोसिएशनचे सरचिटणीस मंदार देशमुख यांनी या विजयानंतर व्यक्त केली. 
 

थरारक अपघात...गाडीत होते खेळाडू....दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये 'तो' अडकून होता..पण..

नाशिक येथील खेळाडूंना घेऊन जात असलेली क्‍लूजर व ट्रकमध्ये झालेल्या अपघातात तीन खेळाडू, दोन शिक्षक व चालकासह सहा जण जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. २७) दुपारी चारला अकोला जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावरील वाशिंबाजवळ घडली. अपघातानंतर चालक दीड तास गाडीच्या कॅबिनमध्ये अडकून होता. दरम्यान, पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यास बाहेर काढले. 

हेही वाचा > PHOTOS : नारोशंकराची घंटा देते 'या' गावाला पुराचा इशारा 

हेही वाचा > पत्नीच्या निधनानंतर बाप पोटच्या मुलीसोबतच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Accidental players reach the final with the will power at Nashik Marathi News