...तिच्या आर्थिक व्यवहारांवर बोलू काही! 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

देशातील एकूण उद्योगांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. उद्योग-धंद्यात नवीन पाऊल टाकायचे असेल, तर ‘मनी बॅंक’ किती आहे, हा प्रश्‍न प्रत्येकाला पडतो.

भारतीय घरांमध्ये महिलांना अर्थविषयक निर्णय प्रक्रियेत दुय्यम स्थान दिले जाते. महिलांना घरातील आर्थिक व्यवहारांपासून दूरच ठेवले जाते. या परिस्थितीत महिलांसाठी उद्योजक बनणे हे खूपच मोठे आव्हान ठरते. उद्योजक होण्याचे ठरवल्यानंतरही अर्थसाहाय्य कसे व कोठून मिळेल ही त्यांच्या पुढची मोठी समस्या असते. या समस्येवर बंगळूरमधील निसरी एम. यांनी ‘हर मनी टॉक’ या स्टार्टअपच्या माध्यमातून उपाय शोधला आहे. 

महिला स्वतःच्या बळावर उद्योजक बनण्याचे प्रमाण भारतात आता काही प्रमाणात वाढत असेल, तरी त्यांना उद्योजक बनण्यापासून दूरच ठेवण्याचा प्रयत्न समाजात दिसून येतो. त्यामुळेच देशातील एकूण उद्योगांमध्ये महिलांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी आहे. उद्योग-धंद्यात नवीन पाऊल टाकायचे असेल, तर ‘मनी बॅंक’ किती आहे, हा प्रश्‍न प्रत्येकाला पडतो. महिलांच्या बाबतीत ही समस्या तर अधिकच प्रकर्षाने जाणवते. महिलांमधील उद्योजकता किंवा त्यांची आर्थिक चणचण दूर करण्यासाठी व त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी वित्त पुरवठा करणाऱ्या यंत्रणांच्या अनेक योजना देखील आहेत. मात्र प्रत्येक गरजू महिलेला त्याची माहिती एकाच ठिकाणी मिळतेच, असे नाही. महिलांना भेडसावणारी हीच समस्या हेरून ती दूर करण्याचे काम हर मनी टॉक्‍स ( Her Money Talks) या स्टार्टअपने केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांना आर्थिक सक्षम करण्याच्या चर्चा नेहमीच होतात, मात्र प्रत्यक्षात त्यांना जेव्हा अर्थपुरवठा करण्याची वेळ येते, तेव्हा त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच आपल्या पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे, ते कुठे गुंतवले तर चांगला परतावा मिळेल, कर्जाची प्रक्रिया काय असते, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, आपल्याला किती कर्ज मिळू शकते, त्यासाठी किती दिवस लागू शकता असे अनेक प्रश्‍न महिलांना पडतात. अर्थपुरवठा करणाऱ्या संस्थांच्या महिलांसाठी विविध योजना आहेत. त्यामुळे महिला आणि या योजना यांच्यातील समन्वय साधण्यासाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म या स्टार्टअपने उपलब्ध करून दिला आहे. त्या आधारे योग्य व सोप्या भाषेत महिलांना सर्व आर्थिक माहिती उपलब्ध होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आर्थिक व्यवस्थापनावर हवी चर्चा - 
घरावर कोणतेही संकट आले, तर त्याची कुटुंबातील सदस्यांत चर्चा होते. मात्र, आर्थिक संकटावर फारच कमी कुटुंबांत चर्चा होते. त्या चर्चेत महिलांचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे या संकटावर कौटुंबिक चर्चा व्हावी व महिला देखील त्यात असाव्यात असा प्रयत्न स्टार्टअप करीत आहे. या स्टार्टअपने आतापर्यंत २५ हजार महिलांना आर्थिकदृष्ट्या शिक्षित केले आहे. निसरी एम. आणि हेमंत गोरूर यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये या स्टार्टअपची स्थापना केली. दोघेही आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महिलांच्या बाबतीतील आर्थिक निर्णय बऱ्याचदा तिचे आई-वडील किंवा पती घेत असल्याचे दिसते. पैशांच्या व्यवस्थापनासाठी त्यांनी इतरांवर अवलंबून राहू नये. याबाबत कुटुंबात चर्चा व्हायला हवी. स्वतःच्या पैशांबाबत निर्णय घेतल्यास महिलांना वेगळ्या नजरेने पाहिजे जाईल, असे वाटत नाही. त्यासाठी त्यांनी स्वतःला आर्थिक शिक्षित करावे. 
- निसरी एम., सहसंस्थापक, ‘हर मनी टॉक’ 

(शब्दांकन - सनील गाडेकर) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article about Nisri M Her Money Talks Startup