सिंधुदुर्गात ११७ ठिकाणी नवरात्रोत्सव

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

सिंधुदुर्गनगरी - घटस्थापनेपासून (ता. २९) नवरात्रोत्सवाला सुरवात होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७ ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून दुर्गामातेची स्थापना होणार आहे. २१ खासगी ठिकाणी दुर्गामातेची स्थापना होणार आहे. 

सिंधुदुर्गनगरी - घटस्थापनेपासून (ता. २९) नवरात्रोत्सवाला सुरवात होत असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७ ठिकाणी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाकडून दुर्गामातेची स्थापना होणार आहे. २१ खासगी ठिकाणी दुर्गामातेची स्थापना होणार आहे. 

या कालावधीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात नवरात्रोत्सवाचे वारे वाहू लागले आहे. रविवार (ता. २९)पासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवाची तयारी सार्वजनिक मंडळातर्फे करण्यात येत आहे. जिल्ह्यात ११७ ठिकाणी सार्वजनिक व २१ खासगी अशा एकूण १३८ दुर्गामातेच्या मूर्तींची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची धावपळ सुरू झाली आहे. जिल्ह्यात अद्यापही पावसाने विश्रांती न घेतल्याने यावर्षी नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमावरपावसाचे विरजण पडण्याची शक्‍यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग- ८, बांदा- ९, सावंतवाडी- १५, वेंगुर्ला- १०, निवती- ५, कुडाळ- १४, आचरा-४, देवगड- ५, विजयदुर्ग- ६, वैभववाडी- ९ अशा एकूण ११७ ठिकाणी दुर्गामातेची जिल्ह्यात स्थापना होणार आहे; तर दोडामार्ग- ४,  सावंतवाडी- ८, वेंगुर्ला- १, कुडाळ-२, मालवण- ५, विजयदुर्ग- १ अशा एकूण २१ खासगी ठिकाणी दुर्गामातेची स्थापना होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 in Sindhudurg special