Navratri Festival 2019 : तेजस्विनी सांगतेय मुंबईच्या मुंबा देवीची व्यथा, बघा फोटो

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

Navratri Festival 2019 :  पुणे : मुंबादेवीच्या नावावरुन ज्या शहराच नाव पडलं ती मुंबई. कित्येकांची कुटुंब, स्वप्न, आशा-आकांक्षा उराशी बाळगुन असते ती. आज त्याच मुंबईची काय अवस्था करुन ठेवली आहे. मुंबईच्या सध्याच्या स्थितीलाअनुसरुन अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने
आज सप्तमीला मुंबा देवीचे रुप साकारले आहे. नवरात्रीत नऊ देवींची रुपी साकरत आहे. प्रत्येक देवीच्या रुपात तीन मानवाने निसर्गावर केलेले अत्याचारांना वाचा फोडली आहे.

Navratri Festival 2019 :  पुणे : मुंबई ज्या देवी्च्या नावावरुन शहराच नाव पडलं ती मुंबादेवी.  कित्येकांची कुटुंब, स्वप्न, आशा-आकांक्षा उराशी बाळगुन असते ती. आज त्याच मुंबईच्या मुंबादेवीची काय अवस्था झाली आहे. मुंबईच्या सध्याच्या स्थितीलाअनुसरुन अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने आज सप्तमीला मुंबा देवीचे रुप साकारले आहे. नवरात्र उत्सवात देवींची नऊ  रुपे साकारत आहे. प्रत्येक देवीच्या रुपात तिने मानवाने निसर्गावर केलेले अत्याचारांना वाचा फोडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Tejaswini Pandit (@tejaswini_pandit) on

मुंबईच्या प्रगतीच्या वाटेवर रस्त्यांवरील खड्डे आणि ट्रॅफिकमुळे मुंबादेवीची होणारी घुसमट तिने व्यक्त आज केली आहे. ''वेगात धावणाऱ्या मुंबईमध्ये मुंबादेवी हरवली असून तिच्या पर्यंत भक्तांचा आवाज ही पोहचत नाही, असे तेजस्वीनी मुंबादेवीच्या रुपातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असा माझा लौकिक ....देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रत्येकाला मी माझ्यात सामावून घेतले.....प्रत्येकाच्या प्रगतीसाठी हृदयाप्रमाणे अखंडित धड्कत राहणारी मी !!! जीवनाचा -प्रगतीचा वेग वाढवणाऱ्या रस्त्याचं जाळ तू इथे विणलं नसतंच तरच नवल होतं........पण त्यावरील अगणित खड्डे? ..ते मात्र  जीवघेणे ठरतायेत....सगळीकडे फक्त ट्राफिक आणि ट्राफिक....हि कसली प्रगती? हरवलेय मी या कोलाहलात ....मला भक्तांची आर्जवे ऐकू येत नाहीत की समुद्राची गाज...अहो रात्र ऐकू येतो तो कर्णकर्कश्श हॉर्न आणि गोंगाट...हि माझी नगरी .....मी मुंबा आणि हि माझी मुंबा पुरी ..मुंबई!!! Image may contain: 1 person, closeup

गेल्या वर्षी नवरात्र उत्सव तिने देवीची नऊ रुपे साकारली होती. यावर्षी देखील तिने हाच प्रयत्न केला आहे. देवीच्या प्रत्येक रुपातून ती समाजाला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswini pandit post photos about mumba devi in Navratri Festival 2019