Navratri Festival 2019 : निमगाव-वाकडाच्या स्वयंभू रेणुकामातेची महती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

निमगाव वाकडा येथील रेणुका देवीच्या मंदिरास भावसार (रंगाऱ्यांची) देवी या नावाचे ओळखले जाते. त्या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहे. सुमारे दीडशे वर्षांपासून भावसार कुटुंबीयांकडून रोज देवीपुढे दिवाबत्ती करणे, साफसफाई केली जाते. येथील रेणूका देवी स्वयंभू असून नवसाला पावणारी आहे 

नाशिक : निमगाव वाकडा (ता. निफाड) येथील रेणुकामाता मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे. रोज मोठ्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. निफाड तालुक्‍यातील निमगाव वाकडा येथील भावसार (रंगऱ्यांची) देवी म्हणूनही ओळखली जाते. नवरात्रात याठिकाणी मोठी यात्रा भरते. दु:खहरण करून मनोकामना पूर्ण करणारे जागृत देवस्थान म्हणून रेणुकादेवीची तालुक्‍यासह जिल्ह्यात ख्याती आहे. त्यामुळे याठिकाणी भाविकांची नेहमीच गर्दी होत असते. तेजस्वी डोळे, कपाळावर मोठे कुमकुम तिलक आणि हिरवे वस्त्र परिधान केलेले देवीचे रूप बघून भक्तांच्या चिंता दूर होतात. 

भावसार कुटुंबियांकडून दीडशे वर्षांपासून मातेची सेवा
भावसार (प्रयागे) कुटुंबात रंगोजी भावसार या नावाचे एक महान देवीभक्त होते. जुने व नवीन कपडे रंगून देणे हा त्यांचा व्यवसाय होता. त्यांना लासलगाव व परिसरात रंगारी या नावाने ओळखले जात. पुढे त्यांनी निमगाव वाकडा येथे बांधलेल्या रेणुका देवीच्या मंदिरास भावसार (रंगाऱ्यांची) देवी या नावाचे ओळखले जाते. त्या मंदिरातील मूर्ती स्वयंभू आहेत. सुमारे दीडशे वर्षांपासून भावसार कुटुंबीयांकडून रोज देवीपुढे दिवाबत्ती करणे, साफसफाई केली जाते. येथील रेणूका देवी स्वयंभू असून नवसाला पावणारी आहे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: goddess renuka from nimgav wakda