Navratri festival 2019 : आज दुसरी माळ ; शुभ्रवस्त्राने नटली आई सप्तशृंगी!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नाशिक : नवरात्रोत्सवाची सोमवार ( ता.३०) आजची दुसरी माळ...वणी येथील सप्तश्रृंगी देवीची आजची सकाळची पंचामृत महापूजा कळवणचे तहसीलदार तथा विश्वस्त बी.ए.कापसे यांनी सपत्नीक केली.

नाशिक : नवरात्रोत्सवाची सोमवार ( ता.३०) आजची दुसरी माळ...वणी येथील सप्तश्रृंगी देवीची आजची सकाळची पंचामृत महापूजा कळवणचे तहसीलदार तथा विश्वस्त बी.ए.कापसे यांनी सपत्नीक केली.

भाविकांसाठी प्रथमच आपत्ती टोल फ्री नंबर उपलब्ध

आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर शारदिय नवरात्रोत्सव सुरुवात झाली असून नवरात्रोत्सव कालावधीसाठी सप्तशृंगी गडावर १२ ते १५ लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांना आपत्ती व्यवस्थापन प्रक्रिया अंतर्गत मदत म्हणून प्रथमच आपत्ती टोल फ्री नंबर उपलब्ध करुन दिला आहे. आदिमायेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या अत्यावश्यक सेवा-सुविधा व मदत कार्य प्रक्रियेसाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४८८५ कार्यान्वित करण्यात आलेला आहे. सदर क्रमांकावर फक्त अत्यावश्यक प्रसंगी संपर्क करण्याचे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, शांतता राखूून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: saptashringi dressed in white dress