एकवीरा गडावर उत्साहात घटस्थापना 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

लोणावळा - नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वेहेरगाव, कार्ला येथील देवी एकवीरेच्या गडावर, खंडाळा येथील वाघजाई देवी मंदिरात उत्साहात घटस्थापना करण्यात आली. परिसरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांच्या वतीने देवीच्या मूर्तीची ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणुका काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना केली. वेहेरगाव, कार्ला येथील एकवीरा देवीच्या गडावर गुरव व देवस्थान विश्‍वस्तांच्या वतीने गुरुवारी सकाळी दुग्धाभिषेक, पूजा करून भक्तिपूर्ण वातावरणात घटस्थापना केली. या वेळी देवीचे महात्म्य व पाठवाचन करण्यात आले. 

खंडाळ्यातील वाघजाई देवी मंदिर  
खंडाळ्यातील जागृत देवस्थान मानल्या जाणाऱ्या वाघजाई देवी मंदिरात वाघजाई देवस्थानच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात घटस्थापना झाली. सकाळी देवीची प्रतिमा व पालखीची मिरवणूक काढण्यात आली. वाघजाई देवस्थान व नवरात्र उत्सव समितीच्या वतीने लोणावळा परिसरातील गुणवंत विद्यार्थी, आदर्श शिक्षक, पत्रकार, खेळाडू, ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्यात आला. 

मावळ तालुका असंघटित कामगार संघ व लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अमित गवळी यांच्या वतीने रायवूड येथे नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे. देवीची उत्साहपूर्ण वातावरणात शहरातून मिरवणूक काढण्यात आली. वळवण येथील श्री दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळ, नांगरगाव येथील महिलांचे दुर्गाष्टमी नवरात्र उत्सव मंडळ, गावठाण येथील शितळादेवी उत्सव मंडळ, भांगरवाडी येथील नवदुर्गा उत्सव मंडळ, ओळकाईवाडी येथील स्वराज्य नवरात्र मंडळांसह रेल्वे विभागातील बंगाली बांधवांच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरण ढोल-ताशांच्या गजरात देवीची मिरवणूक काढत प्रतिष्ठापना झाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lonavala news Ekvira Devi