भद्रकाली देवी मंदिरात ‘सकाळ कलांगण’चा जागर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

नाशिक - चित्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘सकाळ कलांगण’ उपक्रम रविवारी (ता. २४) सकाळी आठला भद्रकाली देवी मंदिरात होणार आहे. शहरातील ललित कला महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या १८ व्या उपक्रमास प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार प्रभाकर झळके, ‘कावळा’ चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते श्रीनिवास मोरे उपस्थित राहणार आहेत. 

नवरात्रीचे औचित्य साधत यंदा भद्रकाली मंदिरात कलेचा जागर होईल. हे मंदिर जुने असून, ते नाशिकचे मूळ ग्रामदैवत मानले जाते. देवीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरास शिखर व कळस नाही. या ठिकाणी नवदुर्गाची मूर्ती असून, मध्यभागी भद्रकालीची उंच मूर्ती आहे. लाकडी खांब असलेल्या या मंदिरातील प्रसिद्ध शक्तिपीठातील पूजेला विशेष महत्त्व आहे. 

या वेळी के. के. वाघ फरफॉर्मिंग आर्ट महाविद्यालयाचे विद्यार्थी, दी ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे विशेष विद्यार्थी, ‘मविप्र’च्या ललित कला महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण करणार आहेत. प्रकाश गायकवाड (अभिनय), प्राचार्य मकरंद हिंगणे (संगीत), अरुण भारस्कर (संगीत), गोपाळ गोसावी, प्रवीण आंबेकर (गायन) हे कलाकार तसेच भद्रकाली मंदिराचे उदयन दीक्षित, अतुल गर्गे, मंदार कावळे आदी उपस्थित राहतील. शहरातील नागरिकांना कला व्यक्त करण्यासाठी या मुक्त व्यासपीठाची स्थापन करण्यात आली असून, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सगळे कलाकार एकत्र येऊन कला सादर करतात. चित्र, शिल्प, गायन, वादन, काव्यवाचन, अभिनय, नकला अशा विविध कला सादर करण्यासाठी कलाकार, चित्रकार, विद्यार्थी, कलारसिक, व्यावसायिक सहभागी होतात. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी शुल्क आकारले जात नाही किंवा कोणतीही अट नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news bhadrakali devi navratrotsav