नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विविध रूपांत पूजा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाईची विविध रूपांतील सालंकृत पूजा बांधली जाणार आहे. प्रत्येक दिवशी विविध रंगांतील साड्यांमध्ये या पूजा बांधल्या जाणार असून, मंदिरातील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 

उत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी (ता. २९) अर्थात घटस्थापनेदिवशी त्रिपुरा सुंदरी रूपातील, तर दुसऱ्या दिवशी सोमवारी (ता. ३०) गंगाष्टक रूपातील पूजा बांधण्यात येणार आहे. मंगळवारी (ता. १) आनंद लहरी या रूपातील, तर बुधवारी (ता. २) यमुनाष्टक रूपातील पूजा बांधली जाईल. गुरुवारी (ता. ३) पंचमीनिमित्त गजारूढ अंबारी रूपातील तर शुक्रवारी (ता. ४) शारदा, शनिवारी (ता. ५) कनकधारा, रविवारी (ता. ६) महिषासुरमर्दिनी, सोमवारी (ता. ७) अन्नपूर्णा रूपातील तर मंगळवारी (ता. ८) विजया दशमी दसऱ्यानिमित्त विजयी रथोत्सव रूपातील पूजा बांधल्या जाणार आहेत. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Durga Ambabai Puja