करवीर निवासिनी श्री अंबाबाईची काशी अन्नपूर्णा रूपात पूजा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या नवव्या दिवशी आज श्री अंबाबाईची काशी अन्नपूर्णा रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मंदिरात भाविकांचा ओघ कायम असून ऐतिहासिक दसरा चौकात उद्या (मंगळवारी) शाही दसरा सोहळा साजरा होणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सायंकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी सूर्यास्तावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर सोने लुटण्याचा थरार अनुभवायला मिळणार आहे. यानिमित्ताने दसरा चौक परिसराला यात्रेचे स्वरूप येणार आहे. विविध खाद्यपदार्थांसह खेळण्याचे स्टॉल आणि करमणुकीच्या साधनांनी येथे हजेरी लावली आहे. 

आजच्या पूजेविषयी... 
आदि शंकराचार्यांनी अन्नपूर्णा स्तोत्र काशीमध्ये वास्तव्याला असताना रचलेले असावे. अन्नपूर्णा म्हणजे पार्वती. शिवाला भिक्षा वाढणारी. जिच्यामध्ये दृश्‍य आणि अदृश्‍य अशा सर्वच विभूती आहेत. जी ब्रम्हांडाची जननी आहे. जी आपली ब्रम्हांडनिर्मितीची लीला विज्ञानाचा दिवा आमच्या अंतरंगात जागवून आमच्यासमोर उघड करते. जी विश्‍वेशाच्या मनाला सुखावते आणि त्याची कृपा सर्वत्र पसरवते. जी काशी क्षेत्राची अधिष्ठात्री आहे, अशी ती अन्नपूर्णा आम्हांला कृपेची भिक्षा देवो, अशी प्रार्थना या पूजेच्या निमित्ताने केली जाते, असे श्रीपूजक केदार मुनीश्वर, प्रसाद लाटकर, रवी माईनकर, आदिनाथ मुनीश्वर यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Karveer Nivasini Ambabai Puja