Navratri Festival 2019 : बचत गटांच्या वस्तू ऑनलाईनने पोहविल्या जगभर 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 29 September 2019

डिजिटल युगात अनेक वस्तू विविध वेबसाईटस्‌वर ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. ऑर्डर केलेल्या वस्तू दारात येऊ लागल्या आहेत. हीच काळाची पावले ओळखून कोल्हापुरातील प्रिती साळोखे आणि सारिका चौगले यांनी ही वेगळी वाट निवडली. आणि बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, पदार्थ ऑनलाईन विक्रीची वेबसाईट सुरू केली.

डिजिटल युगात अनेक वस्तू विविध वेबसाईटस्‌वर ऑनलाईन उपलब्ध होत आहेत. ऑर्डर केलेल्या वस्तू दारात येऊ लागल्या आहेत. हीच काळाची पावले ओळखून कोल्हापुरातील प्रिती साळोखे आणि सारिका चौगले यांनी ही वेगळी वाट निवडली. आणि बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू, पदार्थ ऑनलाईन विक्रीची वेबसाईट सुरू केली. सध्या महिलांनी तयार केलेल्या या वस्तूंना इतकी मागणी वाढली आहे, की ऑनलाईन विक्रीतून लाखोंची उलाढाल ओलांडली आहे. 

प्रिती व सारिका या दोघीही स्वयंसिद्धा संस्थेशी जोडल्या आहेत. स्वयंसिद्धाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना कोल्हापुरात मागणी होतीच. शिवाय संस्थेच्या प्रदर्शनातूनही या वस्तूंची विक्री व्हायची. परंतू याच वस्तू कोल्हापूरबाहेर जात नव्हत्या. कोणत्या वस्तूंना मेट्रो सिटीत मागणी आहे. हे ओळखून त्यांनी वर्षभरापूर्वी ऑनलाईन विक्रीची वेबसाईट सुरू केली. यात पदार्थ, फुटवेअर, हॅंण्डक्राफ्ट, कलाकुसरीच्या वस्तू तसेच कोल्हापुरी स्पेशालिटी वस्तू विक्रीस ठेवल्या. 

मागच्या वर्षी 6 जूनला ही वेबसाईट सुरू केली. त्यापूर्वी सहा महिने याची चाचपणीही केली. या वेबसाईटला देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिसाद मिळू लागला. गेल्या वर्षीच्या दिवाळीत तर लाखांची उलाढाल झाली. कोल्हापुरी चटणी, पायताण, महिलांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू, पर्सेस, बॅग्स, स्टेटर अशा वस्तूंना मागणी वाढली. त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाईन विक्रीच्या वेबसाईटला दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिकसोबतच अमेरिकेसारख्या देशातूनही प्रतिसाद मिळू लागला आहे. 

कोल्हापुरातील कित्येक नोकरदार, व्यावसायिक महिलांना खरेदीसाठी वेळ मिळत नाही. त्यांच्या सोयीसाठी ऑनलाईन विक्रीची वेबसाईट सुरू केली तर फायदा होईल. ही बाब लक्षात घेऊन ही वेबसाईट सुरू केली होती. सध्या त्याला प्रतिसाद मिळत आहे. 
- प्रिती साळोखे, सारिका चौगले .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navratri Festival 2019 Priti salukhe Sarika Chougle Jagar Shtri Sakticha