Navratri: पाकिस्तानसारख्या कट्टर देशाची पहिली महिला PM बनायचं धाडस दाखवणारी बेनझीर

पाकिस्तानच्या पंतप्रधान बनवून बेनझीर भुट्टोंनी एक नवा इतिहास रचला.
Benazir Bhutto
Benazir Bhutto sakal

प्रत्येक क्षेत्रात आज महिला आघाडीवर आहे. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आम्ही तुम्हाला समाजासाठी काम करणाऱ्या काही महिलांविषयी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो (Benazir Bhutto) यांच्याबद्दल सांगणार आहोत.

 बेनझीर भुट्टो या पाकिस्तानच्या पहिला महिला पंतप्रधान होत्या. त्या पाकिस्तानच्या दोन वेळा पंतप्रधान राहल्या. पाकिस्तानच्या पंतप्रधान बनवून त्यांनी एक नवा इतिहास रचला. ज्या पाकिस्तानात स्त्रियांना मर्यादा होत्या, बंधने होती अशात त्यांनी नवा विक्रम रचून अख्या जगाचं लक्ष वेधलं. (first woman PM in pakistan Benazir Bhutto life story )

Benazir Bhutto
Pakistan Cricketer: लाइव्ह मॅच दरम्यान PAK क्रिकेटरच्या मृत्यूची बातमी! खेळाडू म्हणाला...

 21 जून 1953 मध्ये जुल्फिकार अली भुट्टो यांच्या घरी मुलीने जन्म घेतला. जुल्फिकार भुट्टो हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले. बेनझीर भुट्टो यांना राजकीय कारकीर्द वारसा हक्काने मिळाली होती. मात्र तरीसुद्धा त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. 

बेनझीर जेव्हा मोठ्या झाल्या तेव्हा  त्यांच्या जीवाला धोका होता आणि त्यामुळे त्यांना पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठविण्यात आले. जेव्हा त्या परतल्या तेव्हा त्यांनी वडिलांचा राजकीय वारसा सांभाळला. त्यांच्या वडिलांना हत्येच्या आरोपाखाली 4 एप्रिल 1979 रोजी फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

Benazir Bhutto
Pakistan: अर्थव्यवस्था एवढी ढासळली की पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले,"आम्ही भीक..."

बेनझीरचे वडिल जुल्फिकार अली भुट्टोला 1975 मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरुन बर्खास्त करण्यात आले होते. बेनजीर भुट्टो 1988 मध्ये पहिल्यांदा निवडणून जिंकून पाकिस्तानच्या सर्वात युवा पंतप्रधान बनल्या. त्यावेळी त्या फक्त 35 वर्षाच्या होत्या. बेनझीर केवळ दोन वर्षासाठी पंतप्रधान होत्या. त्यानंतर 1990 मध्ये पाक राष्ट्रपतीद्वारा त्यांची सरकार बर्खास्त करण्यात आली.

तीन वर्षानं पुन्हा एकदा त्यांनी निवडणूक लढवली आणि जिंकल्या. 1993 मध्ये बेनझीर या पुन्हा पीएम बनल्या मात्र 1996 मध्ये त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले ज्यामुळे त्यांना जेल सुद्धा जावे लागले. जेल मधून परतल्यानंतर त्यांनी देश सोडला.

Benazir Bhutto
India vs Pakistan : पाकिस्तानने तब्बल 8 वर्षांनी भारताचा Asia Cup मध्ये केला पराभव

मात्र लढाई संपली नव्हती. 2007 मध्ये बेनझीर पुन्हा पाकिस्तानात परतल्या आणि पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान त्यांनी अल कायदासह अनेक आतंकी संगठनांवर निशाणा साधला. या दरम्यान त्यांच्या जीवास धोका निर्माण झाला. 

डिसेंबर 2007 मध्ये एका निवडणूक रॅली दरम्यान बेनझीर या कारच्या सनरूफ बाहेर येत लोकांना अभिवादन स्वीकारत होत्या तेव्हा गोळी मारुन त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर हमला करणाऱ्याने स्वत:लाही बाँबने उडवलं आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधानाचा दुर्दैवी अंत झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com